बेल्हा शाळा नं.१ मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना विनम्र अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:09 AM2021-01-04T04:09:13+5:302021-01-04T04:09:13+5:30
यावेळी विस्तार अधिकारी के. बी. खोडदे, मुख्याध्यापक आजिनाथ घुले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय देशपांडे, उपाध्यक्ष स्वप्निल शिंदे, ग्रामपंचायत ...
यावेळी विस्तार अधिकारी के. बी. खोडदे, मुख्याध्यापक आजिनाथ घुले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय देशपांडे, उपाध्यक्ष स्वप्निल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य बबन औटी, योगिता जाधव, प्रवीणा नायकवाडी, लता पवार, कविता सहाणे, मीरा बेलकर, सुवर्णा गाढवे, विद्यार्थी व पालक, व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी खोडदे म्हणाले, शिक्षणाविषयी अपार प्रेम, एक थोर समाज सुधारक ज्योतिबांच्या सहचारिणी अशा प्रकारचे सर्वगुण संपन्न आणि अष्टपैलू महिला व्यक्तिमत्व म्हणून सवित्रीबाईंकडे पाहिले जाते.ज्या काळात स्त्रीला समाजात मनाचे स्थान मिळत नव्हते शिक्षणापासून आणि स्वातंत्र्या पासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि पारतंत्र ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला.त्या काळात महिलेला चूल आणि मूल,उंबरठा हीच लक्ष्मणरेषा किंवा मर्यादा अशी परिस्थिती होती. मुलगी जर शिकली नाही तर प्रगती होणार नाही व काळाची पावले ओळखून स्त्री सक्षम व सबळ होण्यासाठी पुण्यात सर्वप्रथम मुलींची पहिली शाळा सुरू केली. शाळेत मुली सावित्रीबाई फुले झाल्या होत्या. यावेळी शाळेतील गरिब विद्यार्थींना शालेय पुस्तके,पाटी व पेन देण्यात आले. या वेळी विद्यार्थींची भाषणे झाली. तसेच त्यांचा फुले देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आजिनाथ घुले यांनी केले तर आभार कविता सहाणे यांनी मानले.
बेल्हा (ता. जुन्नर)येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आद्य क्रांतिकारक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अर्पण प्रसंगी खोडदे व विद्यार्थी.