महात्मा गांधी कॉलेजमध्ये कुसुमाग्रज यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:15 AM2021-02-28T04:15:50+5:302021-02-28T04:15:50+5:30
या वेळी विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी यांच्या हस्ते वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या ...
या वेळी विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी यांच्या हस्ते वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक साहेबराव काळे, पर्यवेक्षक यादव चासकर, केशव टेमकर ,किशोर जगताप, धीरज कोळेकर, बाळकृष्ण केदारी, सत्यवान तोञे, दत्तात्रय खोरे, संजय बाणखेले,मुर्तझा मोमीन,सचिन आढळराव,उज्ज्वला बाणखेले, उज्ज्वला हुले, प्रतिभा दीक्षित ,सुवर्णा गोसावी,दुर्गा चौधरी,प्रियांका गवळी उपस्थित होते. प्राचार्य उत्तम आवारी यांनी मराठी भाषेचे महत्त्व विशद करून मराठी कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मराठी भाषा दिवस सुरू झाला व जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी 27 फेब्रुवारीला जागतिक मराठी भाषा दिवस साजरा केला जातो असे मत व्यक्त केले. सत्यवान तोत्रे यांनी आभार मानले.