बारामती शहरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:08 AM2021-07-19T04:08:22+5:302021-07-19T04:08:22+5:30

शाहिरीला चिंतनाची व वैश्विक कार्याची जोड देणारे, कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य ...

Greetings to Lokshahir Anna Bhau Sathe in Baramati city | बारामती शहरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

बारामती शहरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

Next

शाहिरीला चिंतनाची व वैश्विक कार्याची जोड देणारे, कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक म्हणून अण्णा भाऊ साठे यांची विश्वाला ओळख होती. अत्यंत अल्पशिक्षित असला तरी उपजत शाहिराला चिंतनाची आणि वैश्विक कार्याची जोड असेल तर तो अजोड साहित्यिक होऊ शकतो, हे अण्णा भाऊंनी दाखवून दिले. त्यांची लेखणी धारदार होती, असे प्रतिपादन आज विविध मान्यवरांनी केले.

या प्रसंगी विविध मान्यवरांनी अण्णा भाऊ साठे यांच्याबाबत भावना व्यक्त केल्या. समाजाच्या तळागाळातील गरीब शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, दलित व पददलितांच्या व्यथा व वेदना कथा कादंबरीच्या माध्यमातून अण्णा भाऊ यांनी समाजापुढे आणल्या. शाहिराला चिंतनाची जोड असेल व वैश्विक कार्य करण्याची त्याची क्षमता असेल तर तो उत्तम साहित्यिकही होऊ शकतो हे त्यांनी आपल्या लेखनातून दाखवून दिले.

कार्यक्रमाचे आयोजक राजू भाऊसाहेब मांढरे, माजी उपनगराध्यक्ष विजय खरात व माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बिरजू भाऊसाहेब मांढरे, इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, साधू बल्लाळ, विक्रम लांडगे, दशरथ मांढरे, बापूराव शेंडगे, रामहरी बल्लाळ, सोमनाथ पाटोळे, विजय तेलंगे, अंकुश मांढरे, सचिन मांढरे, किरण बोराडे आदी उपस्थित होते.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त बारामती शहरात विविध मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले.

१८०७२०२१ बारामती—०१

Web Title: Greetings to Lokshahir Anna Bhau Sathe in Baramati city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.