आळंदीत शासकीय नियम पाळत महामानवाला अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:10 AM2021-04-15T04:10:30+5:302021-04-15T04:10:30+5:30
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ ...
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी नगरसेविका सुनिता रंधवे, नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे, भारतीय बौद्ध महासभेचे आळंदी शहराध्यक्ष तुषार रंधवे, ज्ञानेश्वर बनसोडे, डॉ. नीलेश रंधवे, सुयोग कांबळे, पोलीस कर्मचारी मच्छिंद्र शेंडे, राहुल डुमणे व विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत, आळंदी व परिसरातील आंबेडकरी अनुयायांनी भीम जयंती साजरी केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञोश्वर साबळे यांनी समाधान व्यक्त केले.
-
चौकट
चऱ्होलीत भीम आर्मीकडून रक्तदान
चऱ्होली खुर्द (ता. खेड) येथील भीम आर्मी तनिश सृष्टी परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३५ दात्यांनी रक्तदान केले. चिंचवड येथील मोरया ब्लड बॅंकेच्या वतीने रक्त संकलित करण्यात आले. बुद्धवंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सद्यस्थितीत कोविड -१९ चा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णांवरील उपचाराकरिता रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे सामाजिक भावनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती बाळासाहेब खरात यांनी दिली. यावेळी साजन - विशाल गायक जोडीपैकी विशाल चव्हाण, चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे नंदकुमार साळवे, युवराज मोटघरे, हर्ष कुंभारे, लखन मोहोड, सुमीत मोटघरे, रोहित कांबळे, मोरया ब्लड बॅंकेचे प्रमोदकुमार सिंग, ऐश्वर्या क्षीरसागर, चैत्राली लोखंडे, सागर पवार आदी उपस्थित होते. याकरिता गणेश कोद्रे यांचे विशेष सहकार्य लाभले.
-
चौकट
आळंदी नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी माजी नगरसेवक अशोक कांबळे, मुख्याधिकारी अंकुश जाधव, कर निरिक्षक रामराव खरात, मिथील पाटील, अर्जुन घोडे, महेश घुंडरे, शशिकांत चव्हाण, सागर भोसले, मल्हारी बोरगे, अक्षय रंधवे, रवींद्र रंधवे आदी उपस्थित होते.
--
फोटो ओळ : आळंदीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, सुनीता रंधवे, डॉ. नीलेश रंधवे, प्रशांत कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर बनसोडे. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)