महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

By admin | Published: December 7, 2014 12:42 AM2014-12-07T00:42:55+5:302014-12-07T00:42:55+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 58 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील विविध संघटनांनी, महाविद्यालयांनी वाचन स्पर्धे चे आयोजन केले होते.

Greetings to Mahamnava Babasaheb Ambedkar | महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Next
पुणो :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 58 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  शहरातील विविध संघटनांनी, महाविद्यालयांनी वाचन स्पर्धे चे आयोजन केले होते.  तसेच त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंबेडकर यांच्या प्रतिमेस मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार जगदीश मुळीक, नवनाथ कांबळे, नागरिक आदी उपस्थित होते. 
पुणो शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड यांनी अभिवादन केले. यावेळी कामगार नेते सुनिल शिंदे, नीता रजपूत, सचिन आडेकर आदी उपस्थित होते. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनाली मारणो यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रदेश महिला उपाध्यक्ष अंजनी निम्हण, सुनिता भोसले, सुरेखा बरडिया आदी उपस्थित होते. काँग्रेस कमिटी मागासवर्गीय विभागांच्या वतीने मागासवर्गीय सभेचे अध्यक्ष मुकेश धिवार यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी समीर नागरगोजे, नवनाथ जाधव, राहूल म्हस्के आदी उपस्थित होते.   
फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज रस्ता, महात्मा फुले चौक येथे ‘वाचाल तर वाचाल’ विद्याथ्र्यासाठी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्याथ्र्याना आंबेडकर लिखित ‘गौतम बुद्ध आणि त्यांचा’ धम्म हा ग्रंथ महाथेरो भदंत राजरतनजी यांच्या हस्ते देण्यात आला.  विचारमंचाचे संस्थापक विठ्ठल गायकवाड, रविंद्र माळवदकर, शंकर गायकवाड, दादासाहेब सोनवणो आदी उपस्थित होते. सिंबायोसिस संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक व संग्रहालय येथे साजरा करण्यात आला. कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे, संस्थेच्या संचालिका डॉ.विद्या येरवडेकर, सिंबायोसिस दूरशिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार, संस्थेचे आरोग्य विभागाचे अधिष्ठाता डॉ.राजीव येरवडेकर आदी उपस्थित होते. सर परशुरामभाऊ महाविद्यालय यांच्या वतीने  डॉ.आंबेडकर अध्यासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन महाविद्यालयाचे ले. कमांडर विनायक अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आले. अभ्यंकर यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय सेना या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.पद्मजा घोरपडे,  डॉ.सोपान शेंडे, गौतम राजगुरु आदी उपस्थित होते. 
 स्त्री आधार केंद्राच्या वतीने स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष व शिवसेना प्रवक्ता उपनेत्या डॉ.निलम गो:हे यांच्या हस्ते पुणो स्टेशन येथील डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. 
यावेळी स्त्री आधार केंद्राच्या लतीका शेवाळे, संघटक सल्लागार आर.डी.शेलार, सरोज पाईकराव आदी उपस्थित होते. मातोश्री रमाबाई आंबेडकर संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने ज्योती राम परिहार यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी संघटनेचे राज्य चिटणीस पुष्पा चव्हाण, नंन्दा सरोदे, सुरेखा आडसुळे आदी उपस्थित होत्या.
महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल यांच्यावतीने अध्यक्ष भगवान वैराट यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी सुधारी नेटके, राम परिहार, अरुन उत्तेकर, सतिष कांबळे आदी उपस्थित होते. पँथर्स रिपब्लिकन पार्टीतर्फे आदरांजली वाहिली. यावेळी जिल्हा अध्यक्ष गौतम डोळस, पुणो जिल्हा उपाध्यक्ष युवराज चंदनशिवे, पि.चि. अध्यक्ष बबन साके आदी उपस्थित होते. दलित पँथर संघटनेतर्फे शहर अध्यक्ष प्रकाश साळवे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रदेश सरचिटणीस सुधाकर शिरसट, महिला आघाडी अध्यक्षा पुजा तायड, शहर सरचिटणीस संजय शिंदे आदी उपस्थित होते.
शिक्षकहितकारणी संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रकाश पवार यांच्या हस्ते हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. संघ प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेतर्फेसंघ प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हजारो महिलांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा, पदाधिकारी नम्रता दुपारगुडे, रेखा शेंडगे, महानंदा डाळींबे, सुजाता धेंडे आदी उपस्थित होत्या. पीपल्स रिपब्लीकन पार्टी च्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश भालेराव यांच्या हस्ते आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उत्तम ओव्हाळ, सुरेश पिवाळ, महमद सय्यद, दादू ओव्हाळ आदी उपस्थित होते.
भारिप युवक आघाडीच्या वतीने डॉ. आंबेकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने, श्रध्दांजली पर गीतांचा भीमसांज कार्यक्रम 
झाला. तसेच पाच हजार मेणबत्त्या प्रज्वलीत करुन आंदराजली वाहण्यात 
आली. अॅड. वैशाली चांदणो 
आणि उमेश चव्हाण यांच्या हस्ते आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उद्योजक संजय फुलपगार, दिलीप सरोदे, दत्ता सुसे आदी उपस्थित होते.  (प्रतिनिधी)
 
4क्रांतीज्योती तर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अतिरीक्त पोलिस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, परिमंडळ 2 चे उपायुक्त पठारे, सह.पो.आयुक्त आत्मचरण शिंदे, अॅड. वैशाली चांदणो, विद्या चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण केला.
4राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ताडीवाला रस्ता प्रभाग क्र. 22 येथे मिलिंद बुध्द विहारमध्ये बुध्द वंदनेचा कार्यक्रम झाला. यावेळी गणोश गायकवाड, भीमराव गायकवाड, महेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.
4 समता सामाजिक संस्थेतर्फे पुणो कॅम्प भागातील सेंटर स्ट्रीट येथे आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुषपहार अर्पण करुन केला. यावेळी महेंद्र गायकवाड, विकास भाबुरे, राजेंद्र शाह आदी उपस्थित होते.
4महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट संघटनेतर्फे नदीम मुजावर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पुणो शहर अध्यक्ष फैयाज शेख, मुस्तफा कपाडीया, इरफान शेख आदी उपस्थित होते.
4पुणो नवनिर्माण सेवेतर्फे अध्यक्ष अजय पैठणकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी एम.खान, तुकाराम पिठले, सुरेश शेवाळे, अरुण गुजर आदी उपस्थित होते.

 

Web Title: Greetings to Mahamnava Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.