राजगुरुनगर शहरात हुतात्म्यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:10 AM2021-03-24T04:10:00+5:302021-03-24T04:10:00+5:30
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य क्रांतिवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या ९० व्या पुण्यतिथीनिमित्त राजगुरुनगर येथे २३ मार्च शहीद ...
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य क्रांतिवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या ९० व्या पुण्यतिथीनिमित्त राजगुरुनगर येथे २३ मार्च शहीद दिन व अभिवादन कार्यक्रम झाला. राजगुरुनगर एसटी स्थानक आवारातील हुतात्मा राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांच्या स्मृतिशिल्पांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. हा कार्यक्रम कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अल्प उपस्थितीत झाला. हुतात्मा राजगुरू यांना अभिवादन शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी अभिवादन केले.खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड देवेंद्र बुट्टे पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय डोळस,पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर,राजगुरूनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज,माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर,जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण,तहसीलदार वैशाली वाघमारे, पोलीस निरीक्षक सतीश गुरव, हिरामण सातकर, मुकुंद आवटे, राजगुरू प्रतिष्ठानचे अध्यक्ष कोंडीभाऊ टाकळकर, राजगुरूनगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील, बाळासाहेब सांडभोर,अशोक दुगड, मनीषा टाकळकर, आदी मान्यवरांनी उपस्थित राहून अभिवादन केले. हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थान असलेल्या राजगुरू वाड्यावर शहीद दिन व अभिवादन कार्यक्रम झाला. प्रांत विक्रांत चव्हाण यांच्या हस्ते वाड्यावर ध्वजारोहण करण्यात आले.हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, सुशील मांजरे, सचिन भंडारी,नरेंद्र गायकवाड, सचिन भंडारी, विश्वनाथ गोसावी, विठ्ठल पाचारणे यावेळी उपस्थित होते.
हुतात्मा राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांच्या स्मृतिशिल्पांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे.