संत वामनभाऊ व संत भगवानबाबा यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:12 AM2021-02-09T04:12:23+5:302021-02-09T04:12:23+5:30
यावेळी पंडित महाराज नागरगोजे, प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी संत भगवानबाबा व वैराग्यमूर्ती वामनभाऊ यांचे जीवनकार्यावर आधारित मार्गदर्शन करीत ...
यावेळी पंडित महाराज नागरगोजे, प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी संत भगवानबाबा व वैराग्यमूर्ती वामनभाऊ यांचे जीवनकार्यावर आधारित मार्गदर्शन करीत त्यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्श असल्याचे सांगत सर्वांनी त्यांचे मार्गदर्शक कार्याचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. या वेळी समाजबांधवांचे वतीने हरिपाठवाचन, प्रवचनसेवा, सत्संग आरती, पसायदान झाले.
याप्रसंगी काशीनाथ गिते, विधितज्ञ सदाशिव आघव, शिक्षण मंडळाचे सदस्य अविनाश बोरुंदिया, विलास सांगळे, गजानन नागरे, भिकाजीराव घुले, विशाल सांगळे, गोरख महाराज नागरगोजे, बाबा सांगळे, हिरामन पगडे, मंडूबाबा पालवे, किसनराव पालवे, राजू दराडे, दत्ताभाऊ खालापुरे, भाऊसाहेब देवरे, अनिल बोडखे, प्रभाकर काकडे, किरण पालवे, नितीन सांगळे, आदित्य सांगळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश बोरुंदिया यांनी केले. सूत्रसंचालन सदाशिव आघव यांनी केले. आभार काशीनाथ गिते यांनी मानले.
०८ आळंदी
आळंदीत संत वामनभाऊ व संत भगवानबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना मान्यवर.