समर्थ संकुलात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:17 AM2021-03-13T04:17:43+5:302021-03-13T04:17:43+5:30
या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, समर्थ अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, एमबीएचे ...
या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, समर्थ अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, एमबीएचे प्राचार्य प्रा.राजीव सावंत, बीसीएसचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण घोलप,पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. अनिल कपिले,प्रा.प्रदीप गाडेकर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र आत्मसात करून त्याप्रमाणे जीवनाची मूल्ये आचरणात आणावी, असे या वेळी संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले.
डॉ. लक्ष्मण घोलप म्हणाले की शिक्षणाविषयी अपार प्रेम, एक थोर समाजसुधारक,ज्योतिबांच्या सहचारिणी, एक उत्तम गृहिणी, कवयित्री,लेखिका,वक्तृत्व व भाषण कला अशा प्रकारचे सर्वगुणसंपन्न आणि अष्टपैलू महिला व्यक्तिमत्त्व म्हणून सावित्रीबाईंकडे पाहिले जाते. मुलगी जर शिकली नाही तर प्रगती होणार नाही व काळाची पावले ओळखून स्त्री सक्षम व सबळ होण्यासाठी पुण्यात सर्वप्रथम १४ जानेवारी १९४८ रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली. पुणे विद्यापीठाने देखील सावित्रीबाईंचे कर्तृत्व आणि शिक्षण क्षेत्रातील कार्याचा गौरव करत विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे केले आहे, असेही त्यांनी सांगितले.