संस्था, संघटनांकडून शाहूमहाराजांना अभिवादन
By Admin | Published: June 27, 2015 03:44 AM2015-06-27T03:44:38+5:302015-06-27T03:44:38+5:30
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड यांनी शाहूमहाराजांच्या प्रतिमेस
पुणे : शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड यांनी शाहूमहाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी विरेंद्र किराड, चंद्रशेखर कपोते, सचिन आडेकर, उत्तम भूमकर, द. स. पोळेकर, मोहन कारंडे, राम काळे, सचिन सावंत उपस्थित होते.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस मागासवर्गीय विभागाच्या वतीने राजर्षी शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू महाविद्यालय सहकार नगर परिसरातील शाहूमहाराजांच्या पुतळ्यास अध्यक्ष मुकेश धिवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी समीरा गवळी, श्रीकांत शिर्के, लतेंद्र भिंगारे, प्रशांत म्हस्के, अक्षय केदारी, चंदन नागरगोजे, सतीश जगदाळे आदी उपस्थित होते.
छत्रपती शाहूमहाराज यांच्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा राधिका मखामले यांनी शाहूमहाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी छाया बारमुख, सुचेता आबनावे, वर्षा मोरे, नयना जाधव, जयश्री क्षीरसागर उपस्थित होते.
जय भवानी टेक्निकल इन्स्टिट्यूूट यांच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा कल्पना उनवणे यांनी शाहूमहाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी विजय मखामले, संतोष व्हावळ, लक्ष्मी दिवटी, वर्षा मोरे आदी उपस्थित होते.
भारिप महासंघ युवक आघाडीच्या वतीने शाहू महाविद्यालयातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास प्रदेशाध्यक्षा अॅड. वैशाली चांदणे व शहराध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी केंद्रीय उपाध्यक्ष एल. डी. भोसले, अनिल गायकवाड, हनुमंत फडके, दला सुरते, मच्छिंद्र गायकवाड, रमेश म्हस्के, दादा गायकवाड, दीपक कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने शाहू महाविद्यालयातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे, जोतिबा नरवडे, बाळासाहेब शिंदे, अजय पवार, प्रदीप तांबे, पार्थ वाल्हेकर आदी उपस्थित होते.