शिवत्रपती विद्यालयात सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:12 AM2021-01-25T04:12:08+5:302021-01-25T04:12:08+5:30
जुन्नर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व श्री शिवछत्रपती महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत शनिवारी (दि २३) नेताजी सुभाषचंद्र ...
जुन्नर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व श्री शिवछत्रपती महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत शनिवारी (दि २३) नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. सुभाषचंद्र बोस यांनी महिलांचे सबलीकरण होण्याच्या उद्देशाने आझाद हिंद सेनेत महिलांना काम करण्याची संधी दिली. त्यामुळेच त्यांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून संस्कृती, समाज व देशसंरक्षणाची जबाबदारी पार पाडता आली, असे उद्गार डॉ. चंद्रकांत मंडलिक यांनी काढले. या वेळी विलास कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. दिपेन्द्र उजगरे, एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. विक्रम रसाळ, प्रा. राहुल पंडित प्रा. वंदना नढे आदी उपस्थित होते.
फोटो : जुन्नर येथील शिवछत्रपती महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक व मान्यवर.