उंड्रीत महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:10 AM2021-04-15T04:10:19+5:302021-04-15T04:10:19+5:30
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं संपूर्ण जीवन मानवकल्याणासाठी वाहिले होते. समाजातून विषमता नष्ट व्हावी, समाजात एकता, समता, बंधुतेची भावना रुजावी ...
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं संपूर्ण जीवन मानवकल्याणासाठी वाहिले होते. समाजातून विषमता नष्ट व्हावी, समाजात एकता, समता, बंधुतेची भावना रुजावी तसेच प्रत्येकाला सन्मानानं, स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळावा यासाठी त्यांनी संघर्ष केला. उपेक्षित बांधवांना 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा संदेश दिला . बाबासाहेबांचे विचार आणि त्यांनी दिलेल्या संविधानामध्ये समस्त देशवासियांना पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे” अशा शब्दांत राजेंद्र भिंताडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचं स्मरण केले.
याप्रसंगी सुभाष कदम, सिद्धार्थ कदम, प्रफुल कदम, धीरज शिंदे, प्रवीण गरुड, डॉ.शाहू, चंद्रशेखर हर्णे , संतोष गोरड आणि उंड्री ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भिंताडे यांनी शासनाच्या वतीने लॉकडाऊन होत असल्याने नागरिकांनी घरीच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले असून अत्यावश्यक असल्यासच बाहेर पडावे , सोशल डिस्टनचे पालन करावे, आपले हात वारंवार धुवावे , मास्कचा वापर करावा व शासन व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे काही अडचण असल्यास आपल्याशी संपर्क करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.