बीआरटीचे वाढले उत्पन्न

By admin | Published: June 1, 2017 02:43 AM2017-06-01T02:43:00+5:302017-06-01T02:43:00+5:30

महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बीआरटी मार्गांची माहिती केल्यानंतर, वॉर्डनची नेमणूक करीत

Gross income of BRT | बीआरटीचे वाढले उत्पन्न

बीआरटीचे वाढले उत्पन्न

Next

पुणे : पुणे महानगर परिवहन
महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बीआरटी मार्गांची माहिती केल्यानंतर, वॉर्डनची नेमणूक करीत अन्य वाहनांना बीआरटी मार्गामधून जाण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या अंमलबजावणीमुळे स्वारगेट ते हडपसर बीआरटी मार्गाचे उत्पन्न वाढले आहे. १ कोटी ९५ लाख ३५ हजार ६३२ रुपयांचे एकूण उत्पन्न मिळाले आहे.
हडपसर ते धायरी या मार्गावर १ ते २९ मे दरम्यान एकूण १७ लाख ४ हजार २० रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, एकूण १ लाख १४ हजार ५१७ प्रवाशांनी
प्रवास केला आहे, तर शेवाळवाडी ते कात्रजदरम्यान ३ लाख ३३ हजार ४०९ प्रवाशांनी प्रवास केला असून, ४५ लाख ३ हजार १५५ रुपयांचे एकूण उत्पन्न मिळाले आहे.
भेकराई ते मनपा मार्गावर २४ लाख ४० हजार ७३५ रुपयांचे एकूण उत्पन्न मिळाले असून, १ लाख २४ हजार ८०२ प्रवाशांनी प्रवास केला. हडपसर ते माळवाडीदरम्यान ३४ लाख ३६६ रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, 2 लाख ३७ हजार ७८४ प्रवाशांनी प्रवास केला आहे.

...या मार्गांवरील उत्पन्नात वाढ
भेकराईनगर ते चिंचवड गावादरम्यान २ लाख ५१ हजार ६० प्रवाशांनी प्रवास केला असून, ५० लाख ३४ हजार ८६१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. भेकराई नगर ते निगडीदरम्यान १० लाख १९ हजार ८८५ रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, ५२ हजार
८२० प्रवाशांनी प्रवास केला. भेकराई नगर ते भोसरी या मार्गावर पीएमपीएमला
१४ लाख ३२ हजार ६१० रुपयांचे एकूण उत्पन्न मिळाले असून, ७८ हजार १०२ प्रवाशांनी प्रवास केला.

Web Title: Gross income of BRT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.