सकल जैन समाजाचा चातुर्मास जाहीर, जैन बांधवात आनंदोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 01:53 AM2018-11-15T01:53:46+5:302018-11-15T01:54:24+5:30
आचार्य शिवमुनीजी म.सा. : जैन बांधवात आनंदोत्सव
पुणे : स्थानकवासी जैन समाजाचे आचार्य डॉ. शिवमुनीजी म. सा. युवाचार्य प. पू. महेंद्रऋषीजी म. सा. आदी ठाणा १२ यांचा २०१९चा चातुर्मास पुणे सकल जैन समाजाला जाहीर झाला. आचार्यजींनी केलेल्या या घोषणेमुळे पुण्यातील जैन समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील अनेक वर्षांपासुन आचार्य प. पू. शिवमुनीजी म. सा. यांचा चातुर्मास पुण्यात व्हावा, यासाठी सर्व जैनबांधव प्रयत्न करीत होते. अनेक वेळा विविध संघांचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी आचार्यजींना विनंती करण्यासाठी गेले होते. त्यांच्या विनंतीला मान देत आचार्य यांनी १२ तारखेला ज्ञान पंचमीचा मुहूर्त साधत चातुमार्साची घोषणा केली. आचार्य शिवमुनीजीचा चातुर्मास पुणे शहराला मिळणे म्हणजे, समस्त पुणेकरांसाठी अभिमानाची व भाग्याची गोष्ट आहे. लाखो भाविक दर वर्षी आचार्यश्रींचे न चुकता दर्शन घेतात. त्यामुळे पुढच्या वर्षी पुण्यातील जैन समाजाला चार महिने खूप मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
पुणे सकल जैन समाजाची एक कमिटी ही चातुर्मास पूर्ण पाडणार आहे. दक्षिण पुण्यात म्हणजेच स्वारगेट ते कात्रज या भागात, तसेच पुणे शहराच्या अनेक भागात पुढच्या वर्षी चातुर्मास होणार नाही. हे सर्व संघ मिळून हा चातुर्मास करणार आहेत.
या चातुर्मास आयोजन कमिटीमध्ये विजयकांत कोठारी, पोपटलाल ओसवाल, विलास राठोड, बाळासाहेब धोका, मदनलाल बलदोटा, जुगराज पालरेशा, प्रकाश धारिवाल, राजेश सांकला, विजय भंडारी, आदेश खिंवसरा, अविनाश कोठारी यांच्यासह विविध संघाचे व संस्थेचे पदाधिकारी सम्मिलीत झाले आहेत. पुणे सकल जैन समाज हा चातुर्मास यशस्वी करण्यासाठी कामाला लागला आहे.