सामान्य शेतक-यांमध्ये बदल घडवायचा असेल तर गटशेतीचा प्रयोग उपयुक्त : कापसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:10 AM2021-01-04T04:10:16+5:302021-01-04T04:10:16+5:30
भारत व इस्त्राईल यांच्या समन्वयाने फळ संशोधन केंद्र हिमायतबाग औरंगाबाद येथे केशर आंबा गुणवत्ता केंद्राची सुरवात केली आहे. या ...
भारत व इस्त्राईल यांच्या समन्वयाने फळ संशोधन केंद्र हिमायतबाग औरंगाबाद येथे केशर आंबा गुणवत्ता केंद्राची सुरवात केली आहे. या प्रकल्पात आधुनिक आंबाबाग उभारणी, घणन लागवड, योग्य खुंटांची निवड, छाटणी, विद्राव्य खतांचा वापर, जुन्या बागांचे नूतनीकरण यांचा अभ्यास केला जातो. यावर संशोधन करून आंबा लागवड ते निर्यात हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा डॉ. पंजाबराव देशमुख राज्य पुरस्कार मिळाला असल्याचे यावेळी डॉ.कापसे यांनी सांगितले.
जुन्नर येथील अभिमन्यू काळे यांच्या आंबा बागेतील झाडांच्या मुळ्यांची पाहणी करताना डॉ. भगवानराव कापसे.
आदिवासी महिलांना रोजगार प्रशिक्षण
घोडेगाव : आदिवासी व दुर्गम डोंगराळ भागात जंगल ही मोठी संपत्ती आहे, जंगलात उपलब्ध होणा-या धनाचा उपयोग करून स्थानिक आदिवासींना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने आदिवासी भागातील बचतगटांना उद्योजकता, रोजगार, मालाची निवड, पॅकिंग व आर्थिक व्यवहार यांचे प्रशिक्षण टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या मार्फत देण्यात आले.
डिंभे येथे झालेल्या या प्रशिक्षणासाठी शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या शाखा व्यवस्थापक सविता चकवे-डुंबरे, वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी अर्चना क्षीरसागर, प्रशिक्षक विजय सांबरे, सारंग पांडे, गौरव काळे, मनीषा जरकड, अमोल केदारी, संदेश पवार, मंगेश उनकुले इत्यादी मान्यवर उपस्थित होत. पंतप्रधान वनधन विकास योजनेतून माझे वन-माझे धन-माझा उद्योग या उद्दिष्टाने हे प्रशिक्षण देण्यात आले.
महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या समन्वयाने आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात अनेक बचत गट काम करत आहेत. बचत गटांमार्फत हिरडा, बेहडा अशा अनेक गौणवनोपजावर काम करण्यासाठी जिज्ञासा लोक संचलित वनधन केंद्र मंजूर झाले आहे. यामध्ये गोहे बुद्रूक, गोहे खुर्द, चपटेवाडी, कानसे, डिंभे या भागातील महिलांनी वनधन केंद्र उभे करावे यासाठी आवश्यक दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.
डिंभे येथे आयोजित महिलांचे प्रशिक्षण शिबिरात बोलताना अर्चना क्षीरसागर.