गट होणार ५० ते ५१ हजार लोकसंख्येचा

By Admin | Published: July 6, 2016 03:15 AM2016-07-06T03:15:23+5:302016-07-06T03:15:23+5:30

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट-गणांच्या फेररचनेच्या कामाला आला असून, जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाला सन २०११ ची तालुकानिहाय व जातीनिहाय लोकसंख्या कळविले आहे.

The group will be 50 to 51 thousand people | गट होणार ५० ते ५१ हजार लोकसंख्येचा

गट होणार ५० ते ५१ हजार लोकसंख्येचा

googlenewsNext

- सुषमा नेहरकर-शिंदे, पुणे

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट-गणांच्या फेररचनेच्या कामाला आला असून, जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाला सन २०११ ची तालुकानिहाय व जातीनिहाय लोकसंख्या कळविले आहे. यामध्ये तेरा तालुक्याची लोकसंख्या तब्बल ३८ लाख ३४ ऐवढी झाली आहे. त्यामुळे आता एका गटासाठी लोकसंख्या पन्नास हजारांच्या पुढे जाणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आगामी निवडणुका फेबु्रवारी २०१७ मध्ये होणार आहेत. या निवडणुकीची पूर्वतायरी म्हणून गट-गणांची फेररचनेचे काम आॅगस्टपासून सुरु होणार आहे. यासाठी पूर्वीची लोकसंख्या, गट-गणांची
लोकसंख्या, सन २०११ ची तालुकानिहाय लोकसंख्या, जातीनिहाय लोकसंख्या आदी माहिती राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाकडे मागवली होती. त्यानुसार सर्व माहिती जिल्हा प्रशासनाने नुकतीच आयोगाला पाठविली आहे.
यामध्ये सन २०११ ची लोकसंख्या विचार घेतली असता तेरा तालुक्याची लोकसंख्या ३८ लाख ३४ हजारांच्या पुढे गेली आहे. जिल्हा परिषदेचे सध्या ७५ गट व पंचायत समित्यांचे १५० गण आहेत. शासनाच्या नियमानुसार गटांची जास्तीत जास्त संख्या ७५ पेक्षा अधिक असू शकत नाही. त्यामुळे सध्याची लोकसंख्या विचारामध्ये घेता एका गटांची लोकसंख्या ५० हजारांच्या पुढे जाणार आहे.
जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत नव्याने काही नगरपालिका स्थापन झाल्या आहेत. तर काही नगरपालिकांची हद्द वाढविण्यात आली आहे. यामुळे गटांमध्ये सामाविष्ट असलेली सुमारे १ लाख २३ हजार ४४२ लोकसंख्या कमी झाली आहे. यामध्ये बारातमी नगर परिषदेची हद्द वाढविण्यात आली. यामुळे जिल्हा परिषदेच्या गटात समाविष्ट असलेली रुई, जळोंची, तांदुळवाडी, बारामती ग्रामीण या गावांची लोकसंख्या कमी झाली. तर खेड तालुक्यामध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या राजगुरुनगर आणि चाकण या नगरपरिषदांमुळे एक-एक गणच कमी झाला आहे.

एकूण लोकसंख्या आणि गटांची लोकसंख्या विचार केला असता जिल्ह्यात बारामती तालुक्यातील तब्बल दोन गट कमी होण्याची शक्यता आहे. तर भोर तालुक्यातील देखील एक गट कमी होण्याची शक्यता आहे. तर खेड आणि हवेली तालुक्यातील गटांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.


तालुका गट सन २०११अपेक्षित
लोकसंख्या गट
मुळशी३१७१००६३
इंदापूर७३५७६६८७
पुरंदर४१८९३२३४
खेड७३५१७६६७
आंबेगाव५२३५९७२५
जुन्नर८३७३९८७८
वेल्हा२५४५१६२
भोर४१६७६६३३
मावळ५२३३४२६५
हवेली१०६११६३११२
दौंड७३३१०४६६
शिरुर६३७४९६२७
बारामती७३२१४४८६

Web Title: The group will be 50 to 51 thousand people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.