भोर तालुक्यात गटनिहाय तक्रार निवारण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:15 AM2021-02-21T04:15:24+5:302021-02-21T04:15:24+5:30

तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर शासकीय कार्यालयात नागरिकाची तक्रारी मोठ्या प्रमाणात होत असतात. परंतु शासकीय कामांमुळे अधिकाऱ्यांना तक्रार निवारण करण्यासाठी वेळ ...

Group wise grievance redressal center in Bhor taluka | भोर तालुक्यात गटनिहाय तक्रार निवारण केंद्र

भोर तालुक्यात गटनिहाय तक्रार निवारण केंद्र

Next

तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर शासकीय कार्यालयात नागरिकाची तक्रारी मोठ्या प्रमाणात होत असतात. परंतु शासकीय कामांमुळे अधिकाऱ्यांना तक्रार निवारण करण्यासाठी वेळ लागत असतो. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे या कामकाजाचे स्वरूप विचारात घेता प्रत्येक गणनिहाय क्षेत्रीय कार्यालयात तक्रारी निवारण केंद्र सुरू करण्यात आले आहे. यावेळी भोलावडे केंद्राचे उद्घाटन करताना गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, सहायक गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे, क्षेत्रीय अधिकारी आर. आर. राठोड, आर. व्ही. चांदगुडे, ए. बी. मदने, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, ग्रामविकास अधिकारी पद्माकर डोंबाळे, प्रसाद सोले व भोलावडे ग्रामस्थ उपस्थित होते. तालुक्यातील नागरिकांनी दिलेल्या तक्रार निवारण केंद्रात जाऊन आपली तक्रार द्यावी. त्याचे निवारण नेमलेले अधिकारी करणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे तनपुरे यांनी सांगितले.

तक्रार निवारण केंद्र व अधिकाऱ्यांचे नाव पुढीलप्रमाणे - भोलावडे नसरापूर गणासाठी केंद्र भोलावडे - आर. आर. राठोड, वेळू भोंगवली गणासाठी केंद्र कापूरव्होळ - आर. व्ही. चांदगुडे , करी उत्रौली गणासाठी केंद्र आंबेघर - ए. बी. मदने याची निवड करण्यात आली असून प्रत्येक आठवड्यात बुधवार - गुरुवार उपस्थित राहून तक्रारी सोडविण्यात येणार आहेत.

भोलावडे येथील केंद्राचे उद्घाटन करताना.

Web Title: Group wise grievance redressal center in Bhor taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.