स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत वाढत्या संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:08 AM2021-07-22T04:08:53+5:302021-07-22T04:08:53+5:30
देशाच्या प्रगतीत आणि अर्थव्यवस्थेमध्ये स्थापत्य अभियांत्रिकीचा (सिव्हिल इंजिनिअर) खूप मोठा वाटा आहे. एखादी इमारत, रस्ता, धरणासारखे काम करायचे असेल ...
देशाच्या प्रगतीत आणि अर्थव्यवस्थेमध्ये स्थापत्य अभियांत्रिकीचा (सिव्हिल इंजिनिअर) खूप मोठा वाटा आहे. एखादी इमारत, रस्ता, धरणासारखे काम करायचे असेल तर स्थापत्य अभियांत्रिकीशिवाय पर्याय नाही. जगातील सर्व आश्चर्यही स्थापत्यशास्त्राचा नमुना आहे. सिव्हिल इंजिनिअर हा खऱ्या अर्थाने सामाजिक अभियंता आहे. कारण संपूर्ण गावाचा शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे सामर्थ्य या शाखेत आहे. म्हणूनच सिव्हिल इंजिनीअरिंग ही शाखा देशाच्या व जगाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाचा दुवा ठरतो. भारत हा प्रगतीशील देश म्हणून ओळखला जातो म्हणजेच भारतामध्ये सुद्धा अजून खूप मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. हा बदल फक्त सिव्हिल इंजिनिअर करू शकतो. त्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंग ला खूप मोठ्या प्रमाणात स्कोप आहे. जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं विचार करत असाल तर हा तुमचा योग्य निर्णय आहे.
जर तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजेच कन्स्ट्रक्शनमध्ये करिअर करायच असेल तर तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री करावी लागते. त्यानंतर तुम्हाला कन्स्ट्रक्शन मध्ये अनुभव घ्यावा लागतो. जर सिव्हिल इंजिनिअरिंग कोर्स करायचा असेल तर दहावीनंतर डिप्लोमा तीन वर्षाचा सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा आहे. आणि डिग्री करायचे असेल तर बारावीनंतर चार वर्षाची डिग्री इन सिव्हील इंजिनिअरिंग असते.
बारावी सायन्सनंतर डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंगच्या थेट दुसऱ्या वर्षी ॲडमिशन मिळते. डिप्लोमाला सेमिस्टर पॅटर्न असतो. सेमिस्टर पॅटर्न म्हणजेच दर सहा महिन्याला विषय बदलतात. या शाखेच्या अंतर्गत खालील उपशाखा येतात. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, हायड्रॉलिक्स इंजिनिअरिंग, टाऊन प्लॅनिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग, अर्थक्वेक इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंट या प्रकारचे विषय असतात. स्थापत्य अभियंत्यांना सर्व प्रकारच्या सर्वेक्षणाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. या शाखेच्या तंत्रज्ञानात सातत्याने बदल होत असतात. या बदलांशी जुळवून घेण्यासाठी सिव्हिल इंजिनिअर ला आपली माहिती व ज्ञान अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे.
- प्रा. अनुप राऊत