कोरोनाचा वाढता धोका गाडेवाडी गावच्या सीमा बंद केल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:09 AM2021-04-19T04:09:28+5:302021-04-19T04:09:28+5:30
राजपूर ग्रामपंचायत अंतर्गत गाडेवाडी, कमलजावाडी, राजपूर गावठाण, पालखेवाडी, शेंगाळवाडी या वाड्यावस्त्यां मिळून राजपूर ग्रामपंचायत आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार ...
राजपूर ग्रामपंचायत अंतर्गत गाडेवाडी, कमलजावाडी, राजपूर गावठाण, पालखेवाडी, शेंगाळवाडी या वाड्यावस्त्यां मिळून राजपूर ग्रामपंचायत आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार येथील सुमारे १३०० लोकसंख्या आहे. तर गाडेवाडीची लोकसंख्या ६८७ आहे. यामध्ये उंडेवाडी, भोतेवाडी, हेमाडेवाडी, बेलाचीवाडी, मोठीवाडी वाड्यावस्त्यांचा समावेश आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये राजपूर ग्रामपंचायत हद्दीत एकही कोरोनाबाधित व्यक्ती मिळाला नाही. परंतु कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये राजपूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये २० कोरोनाबाधित रुग्ण मिळून आले. यामध्ये एकट्या गाडेवाडी येथील १८ रूग्ण आहे. त्यामुळे गाडेवाडी येथील ग्रामस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाडेवाडीमध्ये येणारे- जाणारे रस्ते बंद केले असून गावातील व्यक्तींनी बाहेर जायचे नाही व बाहेरील व्यक्तींनी गावात यायचे नाही यासाठी खबरदारीची उपाययोजना केली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेसाठी रस्ता मोकळा करण्यात येत आहे. आरोग्यसेवक, सेविका आदी प्रशासकीय यंत्रणा गावांतील नागरिकांची तपासणी करून घेत आहे. तसेच जिल्हाधिकारी पुणे यांचे आदेशानुसार नागरिक, दुकानदार यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा न करता विनाकारण फिरताना दिसल्यास किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल. तसेच कोरोना बाबतच्या उपाययोजनांबाबत ग्रामपंचायत राजपूर सरपंच, उपसरपंच, सदस्य व पोलीस पाटील उत्तम वाघमारे, सतीश भोते जनजागृती करत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये कोरोनाचा वाढता धोका म्हणून राजपूर ग्रामपंचायत हद्दीतील गाडेवाडी येथे १८ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्याने येथील ग्रामस्थांनी आपल्या गावच्या सीमा बंद केल्या.