बांधकाम परवाना विभागाची उत्पन्नवाढ

By Admin | Published: January 2, 2015 12:53 AM2015-01-02T00:53:42+5:302015-01-02T00:53:42+5:30

जानेवारी महिन्यात वाढत असलेल्या रेडीरेकनरच्या दराच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने ७१४ प्रस्ताव मंजूर केले आहेत.

Growth of Construction License Department | बांधकाम परवाना विभागाची उत्पन्नवाढ

बांधकाम परवाना विभागाची उत्पन्नवाढ

googlenewsNext

पुणे : जानेवारी महिन्यात वाढत असलेल्या रेडीरेकनरच्या दराच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने ७१४ प्रस्ताव मंजूर केले आहेत. यामधून पालिकेला तब्बल २२५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. परिणामी महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाचे डिसेंबर महिन्यातील उत्पन्न दुप्पट झाले आहे. डिसेंबर २०१३ मध्ये पालिकेच्या बांधकाम विभागाला १०३ कोटी ४३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
एप्रिल २0१४ पासून पालिकेच्या बांधकाम विभागाकडे मंजुरीसाठी येणाऱ्या प्रस्तावांचे प्रमाण कमी झाले होते. नोव्हेंबर महिन्यापर्यंत बांधकाम विभागाला केवळ ३२४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. परंतु, डिसेंबर महिन्यात बांधकाम विभागाकडे परवानगीसाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल झाल्याने उत्पन्नात अचानक वाढ झाली. त्यामुळे एका महिन्यातच पालिकेने २२५ कोटी रुपये मिळविले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये बांधकाम क्षेत्रात असलेल्या मंदीमुळे बांधकाम परवान्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. परिणामी प्रशासनाने ठेवलेले उद्दिष्ट गाठण्याचे मोठे आव्हान होते. मात्र डिसेंबर महिन्यात प्रशासनाने मोठी भरारी घेत ठेवलेले उद्दिष्ट साध्य करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
एप्रिल २०१५ पर्यंत बांधकाम परवाना विभागाने ९०५ कोटी रुपये उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक असलेले ३५० कोटी रुपये मिळविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. बांधकाम विभागाने २०१३-१४ या आर्थिक वर्षासाठी ८०४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी ६५७ कोटी रुपयांचे उद्दिष्ट प्रशासनाने गाठले होते. २०१४-१५ या वषार्साठी प्रशासनाने ठेवलेले संपूर्ण उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)

उत्पन्नाची आकडेवारी
महिनामंजूर मिळालेले उत्पन्न
प्रस्ताव
एप्रिल३०२३८ कोटी १७ लाख
मे३०३३० कोटी ३६ लाख
जून३७६४६ कोटी ५९ लाख
जुलै३५६३९ कोटी ५४ लाख
आॅगस्ट ३२५४३ कोटी ३२ लाख
सप्टेंबर३१५४० कोटी ३० लाख
आॅक्टोबर३०६३९ कोटी ७४ लाख
नोव्हेंबर३१८४६ कोटी ३७ लाख
डिसेंबर७१४२२५ कोटी ४ लाख

कोरेगाव पार्क, प्रभात रस्ता महागडेच
४नोंदणी व मुद्रांक विभागाने शहरात रेडीरेकनरच्या दरात सरासरी १४ टक्के वाढ केली असून, त्यानुसार यंदाही कोरेगाव पार्क परिसर शहरातील सर्वांत महागडे ठिकाण ठरले आहे. येथील दर प्रतिचौरस फुटांसाठी १२,९६० रुपये आहेत, तर पाठोपाठ प्रभात रस्त्याचा दर ११,८९२ रुपये इतका झाला आहे.
४राज्यात खरेदी-विक्री व्यवहारांसाठी नवे वार्षिक बाजार मूल्यतक्ते (रेडी रेकनर) १ जानेवारीपासून लागू करण्यात आले आहेत. ही वाढ करताना, या परिसरांत गेल्या वर्षभर झालेले खरेदी-विक्री व्यवहार, परिसराची संभाव्य वाढ, विकसन क्षमता याचा आधार घेण्यात आला. त्यानुसार घोरपडीमधील कोरेगाव पार्क परिसर हा सर्वात महागडा ठरला आहे. कोरेगाव पार्कमध्ये गतवर्षी सदनिकांचा दर ११,२३१ रुपये प्रतिचौरस फूट होता. यंदा हा दर १२,९१६ रुपयांवर गेला आहे. म्हणजेच त्यात प्रतिचौरस फूट १,६८५ रुपयांनी वाढ झाली आहे. कोरेगाव पार्कमधील सर्व्हे क्रमांक १ ते १७ व लगतचा रेडीरेकनरचा दर चौरस फुटाला १२,४३५ रुपये आहे.
४डेक्कन परिसरातील प्रभात रस्त्यावरील सदनिकांच्या दरातही मोठी वाढ होणार नाही. या रस्त्यावरील रेडीरेकनरच्या दरात वीस टक्के वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १४, १५, लॉ कॉलेज रस्ता, कांचन गल्ली, डॉ. केतकर रस्ता, प्राप्तिकर इमारत रस्ता, अशोक पथ, भांडारकर संस्था या परिसराचा रेडीरेकनर दर ११,८९२ वर गेला आहे. तसेच बाणेर रस्ता ९,०१६, अभिमान श्री ९,७२९, डहाणूकर कॉलनी ८,७५६, पद्मावती ८,७९८, शनिपार ९,१७३, ढोले-पाटील रस्ता ९,५५८, गांजवे चौक ९,०५६, लक्ष्मी रस्ता ८,४६७, केळकर रस्ता ६,५५९ व वारजे येथील दर ५,९०० रुपये प्रतिचौरस फूट झाला आहे.

 

Web Title: Growth of Construction License Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.