‘जीएसटी’ भीतीने सवलतींचा धमाका

By admin | Published: June 27, 2017 07:36 AM2017-06-27T07:36:19+5:302017-06-27T07:36:19+5:30

अवघ्या तीन दिवसांनी देशभरात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होणार आहे. १ जुलैपासून अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर

'GST' explosion of discounts | ‘जीएसटी’ भीतीने सवलतींचा धमाका

‘जीएसटी’ भीतीने सवलतींचा धमाका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : अवघ्या तीन दिवसांनी देशभरात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होणार आहे. १ जुलैपासून अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर चैनीच्या वस्तू महाग होणार आहेत. त्यामुळे दुकान व शोरुम मालकांनी जुना स्टॉक संपविण्यासाठी सवलतीच्या योजना व सेलचा धमाका सुरु केला आहे. त्याचा फायदा उठविण्यासाठी ग्राहकांची खरेदीसाठी घाई सुरू केली आहे. विशेषत मोटार, कपडे तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीला ग्राहकांचे प्राधान्य आहे.
केंद्र व राज्य शासनाने जीएसटी लागू झाल्यानंतर अत्यावश्यक वस्तू वगळात कोणत्या वस्तू महाग होणार आहेत. याविषयीची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये साधारण चैनीच्या वस्तू टीव्ही, फ्रीज, वाहनांवर अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. त्यामुळे विक़्रेत्यांनी जुन्या स्टॉकमधील संबंधित वस्तू विक्रीसाठी नवीन सवलतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. खाद्यपदार्थ यामध्ये लोणी, तूप, बदाम, फळांचा रस, भाज्या, फळे, शेंगा, वनस्पतीपासून तयार केलेले खाद्यपदार्थ लोणचे, मुरंबा, चटणी, जाम, जेली पॅकींगमधील पदार्थांना १२ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. साखर, चहा पावडर, खाद्यतेल, घरगुती एलपीजी, ५०० रुपयांपर्यंतचे बूट, चप्पल आणि हजार रुपयापर्यंतचे कपडे यासाठी ५ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. केसाचे तेल, टूथपेस्ट, साबण, पास्ता, आइस्क्रिम, संगणक, प्रिंटर या वस्तुंसाठी १८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत.
आरटीओच्या महसुलात वाढ
जुलैनंतर वाहन खरेदी केल्यास तीन टक्के अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. ‘जीएसटी’च्या या भीतीने छोट्या व आलेशान मोटरींचे बुकिंग वाढले आहे. नवीन वाहनांच्या नोंदणीमुळे आरटीओकडे मोठ्या प्रमाणात शुल्क जमा होत आहे.

Web Title: 'GST' explosion of discounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.