जीएसटी अधिकाऱ्याचा राष्ट्रपती पुरस्काराने गैरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:18 AM2021-02-06T04:18:55+5:302021-02-06T04:18:55+5:30
पुणे : केंद्रीय जीएसटी व केंद्रीय उत्पादन शुल्क (डीजीजीआय) पुणे विभागीय युनिटमध्ये केलेल्या विशेष कामगीरीबद्दल अजित सुरेश लिमये यांना ...
पुणे : केंद्रीय जीएसटी व केंद्रीय उत्पादन शुल्क (डीजीजीआय) पुणे विभागीय युनिटमध्ये केलेल्या विशेष कामगीरीबद्दल अजित सुरेश लिमये यांना प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पदकाने गैरविण्यात आले.
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले लिमये हे पुण्यातील राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण घेतले. सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून पदवी संपादन केली. १९९८ मध्ये केंद्रीय पदवी व पदव्युत्तर पदवी पूर्ण करण्यापूर्वी त्यांनी केंद्रीय उत्पादन शुल्क व कस्टम विभागात (आताचे केंद्रीय जीएसटी, केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमाशुल्क) गुणवंत क्रीडापटू म्हणून रुजू झाले.
अंतर्गत कर चुकवण्याशी संबंधित गंभीर फसवणूकीच्या प्रकरणांच्या चौकशीची कामगिरी यशस्वीपणे त्यांनी पार पाडली आहे. तेवीस वर्षांच्या सेवा कारकीर्दीत त्यांनी मुंबई व पुण्यात विविध ठिकाणी काम केलेे. सेवा कालावधीत त्यांनी करचुकवेगिरीची १९२ प्रकरणे हाताळली आहेत.