Pune | चुकीच्या पद्धतीने कोणी वागत असेल तर कारवाई करा; पालकमंत्र्याचे प्रशासनाला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 11:08 AM2023-01-04T11:08:27+5:302023-01-04T11:09:13+5:30

निविदा रद्द करण्याची काँग्रेसची मागणी...

Guardian Minister's chandrakant patil order Take action if someone is misbehaving; | Pune | चुकीच्या पद्धतीने कोणी वागत असेल तर कारवाई करा; पालकमंत्र्याचे प्रशासनाला आदेश

Pune | चुकीच्या पद्धतीने कोणी वागत असेल तर कारवाई करा; पालकमंत्र्याचे प्रशासनाला आदेश

Next

पुणे :पुणे महापालिकेच्या पथ विभागाच्या ५३ कोटी रुपयांच्या निविदेत राजकीय दबाब आणल्याची तक्रार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आलेली आहे. त्यावर नियमानुसार निविदा मान्य करा, चुकीच्या पद्धतीने कोणी वागत असेल तर कारवाई करा, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

पुणे शहरातील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली. यामध्ये कोथरूड परिसरातील नव्याने केले जाणारे डीपी रस्त्यांवर चर्चा झाली. तसेच पुढील काळात शहरात साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून डांबरीकरणाची कामे केली जाणार असल्याबाबतही चर्चा झाली. त्यावेळी निविदा क्रमांक चारमध्ये राजकीय दबाव आणला जात असल्याचे पाटील यांना सांगण्यात आले. त्यांनी या सर्व निविदा प्रक्रियेची माहिती घेऊन नियमानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करा. जर कोणी राजकीय दबाव आणून त्यात बदल करून घेत असेल तर त्याची तक्रार माझ्याकडे करा. त्यावर कारवाई केली जाईल, असे पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले.

निविदा रद्द करण्याची काँग्रेसची मागणी

महापालिका प्रशासनाने मोठ्या रकमेच्या निविदा काढल्याने त्यासाठी पात्र ठरणारे मोजकेच ठेकेदार शहरात आहेत. त्यामुळे रस्त्याच्या निविदांमध्ये योग्य स्पर्धा झालेली नाही. यात स्पर्धा झाली असती तर पुणेकरांच्या किमान २५ टक्के रकमेची बचत झाली असती. ठेकेदारांनी पूर्वीच्या हॉटमिक्स प्लांटचे लोकेशन, वैध करारनामा, बीड कॅपेसिटी, खरे अनुभव जोडलेले नाहीत. महापालिका आयुक्तांनी सर्व ठेकेदारांच्या पात्रतेची खातरजमा स्वतःच्या पातळीवर केली तर यातील गैरव्यवहार समोर येईल. त्यामुळे या निविदा रद्द कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Web Title: Guardian Minister's chandrakant patil order Take action if someone is misbehaving;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.