गुऱ्हाळाचे प्रदूषण; गुलछडीचे पीक जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 11:19 PM2018-08-26T23:19:16+5:302018-08-26T23:22:59+5:30

कासुर्डी (ता. दौंड) येथील शेतकऱ्याचे ऐन जोमात आलेले गुलछडीचे पीक गुºहाळाच्या प्रदूषित धुरामुळे जळून गेले आहे

Guava pollution; Horses of a hunchback, Jagger news | गुऱ्हाळाचे प्रदूषण; गुलछडीचे पीक जळाले

गुऱ्हाळाचे प्रदूषण; गुलछडीचे पीक जळाले

Next

यवत : कासुर्डी (ता. दौंड) येथील शेतकऱ्याचे ऐन जोमात आलेले गुलछडीचे पीक गुºहाळाच्या प्रदूषित धुरामुळे जळून गेले आहे. यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सद्य:परिस्थितीत पावसाळा असल्याने गुºहाळचालक भट्टीत सर्रास पाचटाबरोबर रबर, प्लॅस्टिक व इतर कचरा जाळत आहेत. यामुळे पर्यावरणाचीदेखील मोठी हानी होत आहे.

कासुर्डी येथील जावजीबुवाची वाडी महसूल गाव अंतर्गत गट नं. २०७ मध्ये बाळासाहेब लक्ष्मणराव आखाडे यांची शेती आहे. त्यांनी शेतात गुलछडीचे पीक घेतले होते. ऐन गणेशउत्सव व सणासुदीच्या काळात गुलछडीच्या फुलांना चांगला बाजार मिळत असतो. यामुळे या भागातील शेतकरी मोठे कष्ट करून, या दिवसांमध्ये जोमदार पीक आणतात. बाळासाहेब आखाडे यांनी देखील मोठ्या कष्टाने गुलछडीचे पीक वाढविले होते. त्यांच्या शेतीच्या बाजूला मागील काही वर्षांपासून गुळाचे गुºहाळ सुरू झाले आहे. मात्र, गुºहाळच्या भट्टीसाठी पाचट वापरून सदर धूर योग्य उंचीवर सोडल्यास याचा त्रास कमी असतो. यंदा बाजूच्या गुºहाळचालकाने पाऊस सुरू झाल्यानंतर, पाचटाबरोबर रबर, प्लास्टिक आदी घातक कचरा जाळल्याने दोनच दिवसांत गुलछडीचे पीक अक्षरश: जळून गेले. काही कळण्याच्या आतच वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले.

याबाबत, त्यांनी लोकमत प्रतिनिधीशी संपर्क साधून माहिती दिली. सदरबाबत ते तहसीलदार दौंड यांच्याकडे तक्रार अर्ज करणार असून पिकाचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. तसेच, याबाबत प्रशासकीय पातळीवर तातडीने कारवाई न झाल्यास कुटुंबासह उपोषण करणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली.

पर्यावरणासाठीदेखील घातक...
कोणताही व्यवसाय करायचा झाल्यास प्रदूषण होऊ नये यासाठी व्यावसायिकाला अनेक प्रशासकीय मंजुºया व काळजी घ्यावी लागते. मात्र, दौंड तालुक्यात शेकडो गुळाची गुºहाळे सर्व नियम धाब्यावर बसवून चालविली जात आहेत.गुºहाळच्या भट्ट्यांमध्ये रबर प्लास्टिक आदी घातक गोष्टी जाळल्याने काळ्या धुराचे मोठे लोट आजूबाजूला मोठे प्रदूषण करत असतात. यामुळे आजूबाजूची शेती अडचणीत उलट असून अशा प्रदूषणकारी गुºहाळांवर प्रशासनाने कारवाई करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.

Web Title: Guava pollution; Horses of a hunchback, Jagger news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.