गुढीपाडव्यामुळे फुलांच्या दरात ५० टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 09:01 PM2018-03-17T21:01:15+5:302018-03-17T21:01:15+5:30

मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्ताने घरांची व दुकानांची सजावट केली जाते.त्यामुळे झेंडू,गुलछडी,बिजली आदी फुलांना चांगलीच मागणी असते

Gudhi padva flowers rate increasing by 50 percent due to Gudhi padva | गुढीपाडव्यामुळे फुलांच्या दरात ५० टक्के वाढ

गुढीपाडव्यामुळे फुलांच्या दरात ५० टक्के वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देशनिवारी फुल बाजारात पुण्यासह सातारा,सोलापूर जिल्ह्यातून फुलांची मोठी आवक

पुणे: गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील फुल बाजारात गुढीपाडव्यामुळे फुलांची मोठी आवक झाली.फुलांना मागणी असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांच्या दरात तब्बल ५० टक्क्यांनी वाढ झाली.त्यामुळे पाडव्यासाठी राखून ठेवलेल्या फुलांना अधिक दर मिळाल्याने शेतक-यांचा फायदा झाला.
मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्ताने घरांची व दुकानांची सजावट केली जाते.त्यामुळे झेंडू,गुलछडी,बिजली आदी फुलांना चांगलीच मागणी असते.पाडव्यामुळे काही शेतक-यांनी गेल्या आठवड्यात फुलांची तोड केली नाही.त्यामुळे मागील आठवड्यात फुलांची कमी आवक झाली.परंतु,शनिवारी फुल बाजारात पुण्यासह सातारा,सोलापूर जिल्ह्यातून फुलांची मोठी आवक झाली.
फुलांचे व्यापारी सागर भोसले म्हणाले,गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांच्या दरात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.शनिवारी तरकारी बाजार बंद असल्याने फुलांची फारशी आवक होत नाही.परंतु,गुढीपाडव्यामुळे शनिवारी चांगली आवक झाली.त्यात झेंडूला एका किलोला २० ते ६० रुपये, गुलछडीला १६० ते ३०० रुपये ,मोग-याला ५०० ते ६०० रुपये,बिजलीला २० ते ६० रुपये तर लिली बंडलला १० ते १५ रुपये दर मिळाला.
बाजार समितीच्या फुल विभागाचे मंगेश पठारे म्हणाले,यंदा चांगला पाऊस झाल्याने फुलाचे उत्पादन वाढले आहे.त्यामुळे रविवारी झेंडूची ७० हजार,गुलछडीची  ३ .७५ हजार तर ७७५ किलो मोग-याची आणि ६ हजार किलो बिजलीची आवक झाली.परंतु,गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा झेंडूला कमी दर मिळाला.मागील वर्षी झेंडूला ८० ते १०० रुपये दर मिळाला होता.
----------
फुलांचे एका किलोचे दर 
झेंडू : २० ते ६० रुपये 
मोगरा: ५०० ते ६०० रुपये 
गुलछडी: १६० ते ३०० रुपये 

Web Title: Gudhi padva flowers rate increasing by 50 percent due to Gudhi padva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.