गुढी उभारू पाणीबचतीची !

By Admin | Published: April 8, 2016 01:15 AM2016-04-08T01:15:49+5:302016-04-08T01:15:49+5:30

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. काही महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मराठी नववर्षदिनी पाणीबचतीचा संकल्प राबवून पाणीसंकटावर

Gudhi raising water! | गुढी उभारू पाणीबचतीची !

गुढी उभारू पाणीबचतीची !

googlenewsNext

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. काही महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मराठी नववर्षदिनी पाणीबचतीचा संकल्प राबवून पाणीसंकटावर मात करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. पुण्यातील अनेक हॉटलमध्ये पाणीबचतीचे मार्ग अवलंबण्यास सुरुवात झाली आहे. ग्राहकांनी साथ दिल्यास त्याला आणखी बळ मिळून दररोज ६७ टॅँकर पाणी वाचविणे शक्य आहे.
हॉटेल व्यावसायिकांनी सामाजिक भान जपले असले, तरी ग्राहकांकडूनच त्याला अनेकदा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. पूर्ण ग्लास पाण्याऐवजी अर्धा
ग्लास दिला, तर ग्राहकांना ते उष्टे पाणी वाटते. वेटरला याबाबत बोलले
जाते. ग्राहकांच्या मानसिकतेत
बदल झाला, तर पाणीबचत होणे शक्य आहे. पुणे शहराची गेल्या दीड दशकात झपाट्याने वाढ झाली आहे. या वाढत्या नागरीकरणामुळे लोकसंख्येने ३५ लखांचा टप्पा ओलांडला असून मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसायही वाढलेला आहे. हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात पाण्यावर अवंलबून असून स्वयंपाक, ग्राहकांना पिण्यासाठी तसेच भांडी धुण्यासाठी, स्वच्छतेसाठी या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. पाण्याची स्थिती समजून घेऊन बचतीची गरज आहे.
महापालिकेकडे असलेल्या माहितीनुसार, शहरात सुमारे ४५२ अमृततुल्य आहेत. या ठिकाणी पुणेकरांसह विद्यार्थी तसेच नोकदार वर्गाची गर्दी संपूर्ण दिवसभर असते. या प्रत्येक अमृततुल्यामध्ये दिवसाला सरासरी तीनशे ग्राहक गृहीत धरल्यास शहरात १ लाख ३५ हजार ६०० ग्राहक होतात. या ग्राहकांनी एकदा जरी चुळ भरली तरी त्यासाठी सर्वसाधारणपणे ५० मिलिलिटर पाणी गृहीत धरल्यास ६,७८० लिटर पाणी नुसते गुळणी करण्यासाठी वाया जाते. हे पाणी दिवसाला एका टँकरएवढे आहे. तर, महिन्याला 30 टँकरएवढे आहे. त्यामुळे आलेल्या ग्राहकांना ‘पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे; गुळणीसाठी नाही’ एवढाी सूचना दिली, तरी दररोज एक टँकर पाणी वाचविणे शक्य आहे. महापालिकेकडे असलेल्या नोंदणीनुसार, शहरात २२५७ हॉटेल असून, ती महापालिकेचे पाणी वापरतात. या हॉटेलमध्येही दिवसाला सरासरी ३०० ग्राहक गृहीत धरल्यास सरसरी ६ लाख ७७ हजार १०० ग्राहक शहरातील लहानमोठ्या हॉटेलमध्ये जातात. या वेळी या ग्राहकांना पिण्यासाठी ग्लासमध्ये पाणी दिले जाते.
अनेक ग्राहक दिलेले ग्लासभर पाणी पूर्र्ण पीत नाहीत. हे पाणी शिल्लक राहिल्यानंतर हॉटेल व्यावसायिक ते फेकून देतात. प्रत्येक ग्राहकाच्या ग्लासमधून सरासरी १०० मिलि पाणी शिल्लक राहिले, असे गृहीत धरल्यास दिवसाला ६ लाख ७७ हजार १०० लिटर पाणी वाचविणे शक्य आहे. एका टँकरमध्ये सरासरी १० हजार लिटर पाणी मावत असल्याने हे पाणी जवळपास ६७ टँकरएवढे आहे.

Web Title: Gudhi raising water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.