गुढ्या उभारल्या साखर घाठीशिवाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:11 AM2021-04-14T04:11:01+5:302021-04-14T04:11:01+5:30
त्या मुळे अनेक ठिकाणी यावर्षी च्या गुढ्या साखरगाठी शिवाय उभारण्याची नामुष्की नागरिकांवर आली. बाजारपेठेत साखर गाठी दिसू लागल्या की, ...
त्या मुळे अनेक ठिकाणी यावर्षी च्या गुढ्या साखरगाठी शिवाय उभारण्याची नामुष्की नागरिकांवर आली.
बाजारपेठेत साखर गाठी दिसू लागल्या की, गुढीपाडवा आल्या चे वातावरण तयार होते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन होणार या संभ्रमात दुकानादार होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी गुढी साठी लागणाऱ्या साखर गाठीमध्ये भांडवल गुंतवणूक करण्यासाठी हात आखडता घेतला. साखर घाठीचे महत्त्व गुढीपाडव्यानंतर
उरत नसल्याने गुंतवणूक वाया जाऊ नये म्हणून साखर गाठी बाजारातून गायब झाल्याचे चित्र दिसत होते ज्यांच्या कडे होत्या त्यांनी मात्र दुप्पट किंमतीने विकल्या.
घरच्या देवाऱ्यात, दरावर, लहान मुलांना व गुढी गाठी अशा किमान चार गाठी घेणाऱ्या नागरिकांना यावेळी दोन साखर गाठीसाठी पन्नास रुपये मोजावे लागले.
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला चौका चौकात, टपरीवर, हार फुलांच्या दुकानात, पुजा साहित्य विक्रेत्यांकडे साखर गाठी टांगलेल्या आढळतात मात्र सोमवारी सायंकाळी अचानक कोसळलेल्या पावसाने अनेकांच्या साखर गाठी पार विरघळून गेल्या तर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या खरेदी वर मुसळधार पावसाने विरजण पडले. जे घरात होते त्यांनी दुसऱ्या दिवशी खरेदी करण्याचा निर्णय घेतला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी नव्या जोमाने बाहेर पडलेल्या नागरिकांनी धनकवडी, सहकारनगर, बालाजीनगर, पद्मावती, भारती विद्यापीठ परिसरात फिरून साखर गाठी शोधल्या मात्र अचानक आलेल्या पावसाने साखर गाठीशिवाय गुढी उभारण्याची वेळ अनेक नागरिकांवर आली.