उंड्री परिसरात गुढीपाडवा साधेपणाने साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:09 AM2021-04-14T04:09:28+5:302021-04-14T04:09:28+5:30
उंड्री, पिसोळी,कोंढवा आणि वडाचीवाडी या भागात गुढीपाडवा हा सण लोकांनी अगदी साधेपणाने साजरा केला. अगदी सोसायटीच्या काही घरांच्या ...
उंड्री, पिसोळी,कोंढवा आणि वडाचीवाडी या भागात गुढीपाडवा हा सण लोकांनी अगदी साधेपणाने साजरा केला. अगदी सोसायटीच्या काही घरांच्या गच्चीवर तुरळक अशा गुड्या उभ्या केल्या होत्या.
सकाळी गुढीसाठी लागणारा साखरेचा हार दुकानात उपलब्ध नव्हता, ज्या दुकानदाराकडे होता, त्यांनी वाजवी किमतीपेक्षा अधिक किमत सांगितली. दोन दिवस मार्केट बंद असल्याने अनेक वस्तूंचे दर वाढले होते.
या भागातील बहुतंश परप्रांतीय मजूर आपल्या मूळ गावी जाताना दिसत होते, कारण लॉकडाऊन या भीतीने आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांच्या मनात भीती निर्माण झाल्याचे स्पष्ट जाणवत होते. लॉकडाऊन झालं तर जगायचे कसं आणि आमच्या मुलाबाळाचे पोटाचे काय करायचं? असाच प्रश्न त्यांच्यापुढे होता.