प्रकाश सापळ्यांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:10 AM2021-05-21T04:10:26+5:302021-05-21T04:10:26+5:30
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांशी शेतकऱ्यांनी शेतामध्ये ऊस, मका, भुईमूग, ज्वारी आदी यांसारखी पिके घेतली आहेत. या पिकांवर हुमणीचा ...
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांशी शेतकऱ्यांनी शेतामध्ये ऊस, मका, भुईमूग, ज्वारी आदी यांसारखी पिके घेतली आहेत. या पिकांवर हुमणीचा ४० ते ८० टक्के प्रादुर्भाव झालेला आढळून येतो. या हुमणी रोगामुळे पिकांचे अतोनात नुकसान होते. यामध्ये प्रामुख्याने आळी आणि भुंगेरा हे पिकांचे नुकसान करीत असतात. सुप्तावस्थेत असलेले भुंगेरा आणि आळी हे सूर्यास्तानंतर बोर, कडुलिंब आणि बाभूळ या झाडांवर बसलेले आढळतात. जर शेतकऱ्यांनी या वृक्षाभोवती सूर्यास्तानंतर म्हणजेच सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रकाश सापळा तयार करून ठेवला तर त्यात भुंगेरा आणि आळ्या अडकून पडतात व त्यात रॉकेलमिश्रित पाणी मिसळून त्यावर ओतल्यास आळी आणि भुंगेरा यांचा त्यांचा नायनाट होतो, अशी माहिती कृषी विभागाच्या सणसर येथील मंडलाधिकारी के. आर. माळवे, पर्यवेक्षक सी. एन. सुतार व कृषी सहाय्यक एस. जी. कांबळे यांनी दिली.
त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर पिके प्रात्यक्षिक व बियाणे वाटप करण्यात येणार असून त्याची मुदत २० मेपर्यंत आहे, अशी माहिती मंडलाधिकारी के. आर. माळवी यांनी दिली.
कळंब येथील शेतकऱ्यांना हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळे तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
२००५२०२१-बारामती-०१