रानमळा येथे कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:08 AM2021-07-08T04:08:33+5:302021-07-08T04:08:33+5:30
या निमित्ताने जीआयसीचे विभागप्रमुख अतुल ढेरे यांनी सोयाबीन व बटाटा पिकांविषयी मार्गदर्शन केले. पाईट येथील मंडळ कृषी अधिकारी ...
या निमित्ताने जीआयसीचे विभागप्रमुख अतुल ढेरे यांनी सोयाबीन व बटाटा पिकांविषयी मार्गदर्शन केले. पाईट येथील मंडळ कृषी अधिकारी विजय पडवळ यांनी कृषीविषयक योजनांची माहिती देत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप-२०२१ मध्ये सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. कृषी पर्यवेक्षक माणिक वाळे यांनी कै. वसंतराव नाईक यांनी केलेल्या कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरी बाबत माहिती दिली. भामा-भीमा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी अध्यक्ष अनिल कदम यांनी कंपनीच्या वाटचालीबाबत माहिती दिली. उल्हास भुजबळ यांनी शेतकरी प्रतिनिधी म्हणून मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कृषी सहायक मोहिनी अकोलकर - सावंत यांनी केले. या वेळी सरपंच प्रमोद शिंदे, विजय दौंडकर, गोरक्ष सुकाळे, तुळशीराम भुजबळ, रामभाऊ भुजबळ, नवनाथ वाघोले, मच्छिंद्र मोरे, शिवाजी शिंदे उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : ०७कडूस रानमळा कृषी दिन
फोटो ओळी : रानमळा (खेड) येथे कृषी दिनानिमित्त ग्रामस्थांनी उत्तम सहभाग घेतला.