महिलांसाठी आरोग्य विषयावर मार्गदर्शन - ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:10 AM2021-03-15T04:10:32+5:302021-03-15T04:10:32+5:30

तसेच संस्थेचे चेअरमन सागर ढोले पाटील यांनी संस्थेच्या अंतर्गत सर्व महाविद्यालय व शाळांमध्ये असणाऱ्या महिला शिक्षिका व विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण ...

Guidance on Health for Women - Organized by Dhole Patil Education Society | महिलांसाठी आरोग्य विषयावर मार्गदर्शन - ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजन

महिलांसाठी आरोग्य विषयावर मार्गदर्शन - ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजन

Next

तसेच संस्थेचे चेअरमन सागर ढोले पाटील यांनी संस्थेच्या अंतर्गत सर्व महाविद्यालय व शाळांमध्ये असणाऱ्या महिला शिक्षिका व विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण अभ्यासक्रम घेण्यात येईल व त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात करावी, अशी घोषणा केली.

डॉ. अरुण शिंदे यांनी ताण-तणाव व्यवस्थापन वरती व्याख्यान दिले, तर गणपत सोनटक्के आणि प्रणव गायकवाड यांनी आपल्या चॅम्पियन कराटे क्लब च्या वतीने महिलांना स्व-संरक्षण प्रशिक्षण दिले. तसेच फिजिओथेरपी कॉलेजच्या वतीने महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. सेक्रेटरी उमा पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन करून सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी विद्यार्थिनींनी महिला सबलीकरणावर गीत, नृत्य सादर करून रांगोळी च्या माध्यमातून संदेश दिला.

या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे चेअरमन सागर ढोले पाटील व सेक्रेटरी उमा सागर ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पूजा शर्मा प्रा. सायली शिवरकर डॉ. प्रियंका पाटील प्रा.मनीषा सिंग प्रा. निशा माने, प्रा.अंजली शिरामकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्युनिअर कॉलेजच्या अकॅडमिक डीन व स्कूलच्या प्राचार्या डॉ.अनुराधा अय्यर यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Guidance on Health for Women - Organized by Dhole Patil Education Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.