कार्यशाळेतून विद्यार्थ्यांच्या करिअरबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:12 AM2021-09-22T04:12:05+5:302021-09-22T04:12:05+5:30
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप शिंदे व चंद्रकांत देवडा ...
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप शिंदे व चंद्रकांत देवडा यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. डॉ. सुनील ओगले यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील उपक्रमांची माहिती दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे अधिकारी विशाल कोरे यांनी युवकांना व्यक्तिमत्त्व विकास व रोजगारक्षम कौशल्य विकसित करण्याची संधी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, डॉ. शामराव घाडगे, उपक्रमाचे समन्वयक डॉ. संजय खिलारे, डॉ. राजाराम चौधरी यांनी विद्यार्थ्यांसमवेत विविध विषयांबाबत संवाद साधला.
शाखानिहाय समन्वयक प्रा. राजेंद्र वळवी, डॉ. अमर भोसले, डॉ. राजेश शर्मा, डॉ. रमेश देवकाते, डॉ. सुजाता पाटील, प्रा. गजानन जोशी, प्रा. महेश पवार, प्रा. किशोर ढाणे यांनी ‘पदवीनंतर असणाऱ्या संधी’ या विषयी मार्गदर्शन केले. अमेरिकेतून संगणक शास्त्राचे माजी विद्यार्थी समारोप समारंभास उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, खजिनदार युगेंद्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, विश्वस्त सुनेत्रा पवार, किरण गुजर, मंदार सिकची, डॉ. राजीव शहा व रजिस्ट्रार शिरीष कंबोज यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
———————————————