मका पिकाबबात महिलांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:08 AM2021-06-17T04:08:33+5:302021-06-17T04:08:33+5:30
या शेतीशाळेच्या माध्यमातून मका या पिकाच्या पूर्वमशागतीपासून बियाणे निवड ते काढणी व काढणी पश्चात तंत्रज्ञान तसेच विकेल ते ...
या शेतीशाळेच्या माध्यमातून मका या पिकाच्या पूर्वमशागतीपासून बियाणे निवड ते काढणी व काढणी पश्चात तंत्रज्ञान तसेच विकेल ते पिकेल या योजनेंतर्गत विक्री व्यवस्था याचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तंत्र अधिकारी सुप्रिया शिळीमकर यांनी शेतीशाळेची संकल्पना, बियाणे निवड, बीजप्रक्रिया व कृषी विभागाच्या विविध योजना याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रम सन २०२१-२२ अंतर्गत बाजरी या पिकाच्या प्रकल्पासाठी ज्या शेतक-यांनी अर्ज केले होते. त्यांना मान्यवरांच्या हस्ते बियाण्यांचे वितरण करण्यात आले. कृषी सहायक मीरा राणे यांनी यावेळी बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक सुप्रिया पवार यांनी केले. तसेच या शेतीशाळेचे आयोजन देऊळगाव रसाळच्या कृषी सहायक तृप्ती गुंड यांनी केले होते.
------------------------------
फोटो ओळी : देऊळगाव रसाळ येथे पिकेल ते विकेल योजनेअंतर्गत महिलांना कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.
१६०६२०२१-बारामती-०१
------------------------------------