वडगावात गुलाल, डीजे, फटाकेमुक्त मिरवणूक

By admin | Published: September 26, 2015 01:47 AM2015-09-26T01:47:03+5:302015-09-26T01:47:03+5:30

येथे २५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणरायाचे सातव्या दिवशी आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेल्या रथातून ढोल ताशा, ढोल लेझीम व पारंपरिक

Gulzal, DJ, cracker-free procession in Wadgaon | वडगावात गुलाल, डीजे, फटाकेमुक्त मिरवणूक

वडगावात गुलाल, डीजे, फटाकेमुक्त मिरवणूक

Next

वडगाव मावळ : येथे २५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणरायाचे सातव्या दिवशी आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेल्या रथातून ढोल ताशा, ढोल लेझीम व पारंपरिक वाद्यांच्या निनादात उत्साहात भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.
मंडळांनी शांततेत गुलाल, भंडारा, डीजे व फटाकेमुक्त मिरवणूक काढली. मिरवणुकीत युवती व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
ग्रामदैवत श्री पोटोबा देवस्थान संस्थान व जय बजरंग तालीम या मानाच्या गणरायांची मावळ पंचायत समिती चौक येथून सायंकाळी ५ वा. मिरवणूक सुरू करण्यात आली. सिद्धिविनायक, मोरया व पोलीस ठाणे या गणपतीचा समावेश होता. अग्रभागी असलेल्या मोरया ढोल पथकाचे वाद्यकाम व साहसी तलवारबाजी खेळ सादर करणाऱ्या पथकातील युवक व युवती उपस्थितांचे आकर्षण ठरले. बालविकास, जय जवान जय किसान, अष्टविनायक, जयहिंद, गणेश तरुण, आदर्श, नवचैतन्य, श्रीराम, कानिफ नाथ तरुण, साईनाथ, विजयनगर, योगेश्वर प्रतिष्ठान, पंचमुखी मारुती, इंद्रायणी, दिग्विजय, शिवशंभू हे २० गणेशोत्सव मंडळ सहभागी झाले होते.
मंडळांनी गुलाल, भंडारा, डीजे व फटाक्यांचा वापर टाळला असून, टॅ्रक्टर व ट्रकवर विद्युत रोषणाईसह आकर्षक सजावट करून रथामध्ये गणेश मूर्ती विराजमान केली.
पंचशील, शिवज्योत, ओंकार, जयमल्हार ग्रुप, माळीनगर, वक्रतुंड, भैरवनाथ, श्रीमंत महादजी शिंदे, शितळादेवी मित्र मंडळासह घरगुती गणरायाचे दुपारी विसर्जन करण्यात आले.
चावडी चौक येथे वडगाव-कातवी ग्रामपंचायत, वडगाव शहर भाजपा युवा मोर्चा, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने, तर शिवाजी चौक येथे वडगाव शहर विकास समिती, स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान, काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, विद्यार्थी संघटनेच्या वतीने गणेशोत्सव मंडळांचे स्वागत करण्यात आले. तहसीलदार शरद पाटील व उपअधीक्षक विनायक ढाकणे यांनीही स्वागत केले. निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक महेंद्रसिंह निंबाळकर, उपनिरीक्षक आदित्य लोणीकर, पोलीस कर्मचारी व गृहसुरक्षा दलांनी शांततेत विसर्जन मिरवणूक पार पाडली. ग्रामपंचायतीने विसर्जन व्यवस्था योग्य ठेवली होती. मोठ्या गणेश मूर्तींचा आंबी येथील इंद्रायणी नदीवर विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Gulzal, DJ, cracker-free procession in Wadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.