गजा मारणोच्या ‘गेम’साठी आलेल्या गुंडाला अटक
By Admin | Published: November 30, 2014 12:18 AM2014-11-30T00:18:23+5:302014-11-30T00:18:23+5:30
कुख्यात गजा ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणो याचा ‘गेम’ वाजवण्यासाठी आलेल्या नीलेश घायवळ टोळीच्या गुंडाला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने पिस्तुलासह अटक केली आहे.
पुणो : कुख्यात गजा ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणो याचा ‘गेम’ वाजवण्यासाठी आलेल्या नीलेश घायवळ टोळीच्या गुंडाला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने पिस्तुलासह अटक केली आहे.
संतोष आनंद धुमाळ (वय 3क्, रा. समर्थ बिल्डिंग, उजवी भुसारी कॉलनी, कोथरूड) असे अटक आरोपीचे नाव आहे. घायवळ टोळीचा गुंड पप्पू गावडे याचा दोन आठवडय़ांपूर्वी लवळे येथे मारणो टोळीने खून केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी धुमाळने गजाला मारण्याचे ठरवले होते. त्यासाठी तो कोथरूड येथील बांदल कॅपिटल इमारतीसमोर आला होता. याची माहिती खब:यामार्फत पोलीस नाईक संजय काळोखे यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विठ्ठल शेलार, उपनिरीक्षक मारुती भुजबळ, गणोश माळी, सचिन अहिवळे, सिद्धार्थ लोखंडे, बबन बो:हाडे, राजू पवार यांनी सापळा लावून धुमाळच्या मुसक्या आवळल्या. झडतीत त्याच्याकडे एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळाले आहे. त्याच्याविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, असे 15 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेले आहे.