Gunratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात हजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 12:19 IST2022-05-05T10:29:44+5:302022-05-05T12:19:00+5:30
गुणरत्न सदावर्ते पुण्यात पोलीस ठाण्यात हजर

Gunratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात हजर
पुणे : गुणरत्न सदावर्ते भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. सदावर्ते यांच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणात हजर राहण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानुसार गुणरत्न सदावर्ते पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.
गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये ऑक्टोबर 2020 मध्ये एक गुन्हा दाखल आहे. छत्रपती संभाजी राजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एका व्यक्तीने तक्रार दिली होती. त्यानुसार सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.