गुणरत्न सदावर्ते यांची जीभ हासडणाऱ्याला ११ लाखांचे बक्षिस; बारामतीत कामगार संघटनांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 12:57 PM2022-04-17T12:57:11+5:302022-04-17T12:59:36+5:30

बारामती एमआयडीसी मध्ये रविवारी (दि. १७) विविध कामगार संघटनांनी मुंबई येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा निषेध करत वकील गुणरत्न सदावर्ते यांना आव्हान दिले

Gunaratna Sadavarte tongue lashing prize of Rs 11 lakh Announcement of trade unions in Baramati | गुणरत्न सदावर्ते यांची जीभ हासडणाऱ्याला ११ लाखांचे बक्षिस; बारामतीत कामगार संघटनांची घोषणा

गुणरत्न सदावर्ते यांची जीभ हासडणाऱ्याला ११ लाखांचे बक्षिस; बारामतीत कामगार संघटनांची घोषणा

Next

बारामती : जो कोणी गुणरत्न सदावर्ते याची जिभ हासडेल त्याला मी माझ्या वतीने ११ लाख रुपयांचे बक्षीस देईन. वजी कामगार महिला त्या गुणरत्न सदावर्ते च्या हातात बांगड्या भरेल तिला मी ५ लाख रुपयांचं बक्षीस देईन. अशी घोषणा बारामती टेक्स्टाईल पार्क चे कामगार तुकाराम चौधर यांनी माध्यमांशी बोलताना बारामती येथे केली. बारामती एमआयडीसी मध्ये रविवारी (दि. १७) विविध कामगार संघटनांनी मुंबई येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा निषेध करत वकील गुणरत्न सदावर्ते यांना आव्हान दिले. 

चौधर पुढे म्हणाले, सदावर्ते हा माणूस विविध कामगार संघटनांमध्ये शिरून कामगारांना पुढे संकट निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यामधूनच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. बारा एप्रिल रोजी सदावर्ते म्हणाले होते बारामती मध्ये पवारांच्या घरा समोर आंदोलन करू. मात्र सदावर्ते व त्यांच्या मनोवृत्तीच्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो बारा तुम्ही बारामती मध्ये येऊन तर पहा आम्ही त्यांची वाटच पाहत आहोत, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

Web Title: Gunaratna Sadavarte tongue lashing prize of Rs 11 lakh Announcement of trade unions in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.