विमानतळासाठी गुंठासुद्धा भूसंपादन होऊ देणार नाही : शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:01 AM2018-07-24T01:01:05+5:302018-07-24T01:01:44+5:30

जोपर्यंत एकही शेतकरी आपली जमीन स्वखुषीने देत नाही तोपर्यंत त्यांच्या परवानगीशिवाय एक गुंठासुद्धा भूसंपादन करून देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला

Gunda will not allow land acquisition for airport: Shetty | विमानतळासाठी गुंठासुद्धा भूसंपादन होऊ देणार नाही : शेट्टी

विमानतळासाठी गुंठासुद्धा भूसंपादन होऊ देणार नाही : शेट्टी

Next

वाघापूर : पुरंदरमधील शेतकरी वर्षानुवर्षे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शेतीच्या जिवावर आपली उपजीविका करीत आहे. असे असताना शासनाने त्यांना मूलभूत सुविधा देणे गरजेचे आहे. परंतु, त्या देण्याऐवजी त्यांच्या जमिनी जबरदस्तीने हिसकावून घेतल्या जात आहेत. जोपर्यंत एकही शेतकरी आपली जमीन स्वखुषीने देत नाही तोपर्यंत त्यांच्या परवानगीशिवाय एक गुंठासुद्धा भूसंपादन करून देणार नाही, असा इशारा देतानाच शासन स्थानिक भूमिपुत्रांचे थडगे बांधून त्यावर विकासाचे मनोरे कुणासाठी उभारत आहे? असा जळजळीत सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.
सासवड (ता. पुरंदर) येथे एका कार्यक्रमासाठी सोमवारी आले होते. या वेळी त्यांनी शासनावर कठोर शब्दांत प्रहार केला. या प्रसंगी माजी राज्यमंत्री दादा जाधवराव, मनसेचे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव, ज्येष्ठ नेते विजय कोलते, भाजपच्या नेत्या संगीताराजे निंबाळकर, जि.प.च्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बादल, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे आदी उपस्थित होते.
शेट्टी यांनी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा खमक्या असावा लागतो, असा टोला राज्यमंत्री विजय शिवतारे यांना लगावला.राजकारणातील गटारगंगा स्वच्छ करण्यासाठी अशी गटारे बंद करा आणि स्वच्छ चारित्र्याची निवडून द्या, त्यानंतरच सुप्रशासन येईल व जनतेला न्याय मिळेल. त्यासाठी जनतेने अशी माणसे शोधावीत, असे आवाहन केले.
विमानतळामुळे उद्योजकांचा विकास होणार असला, तरी स्थानिकांना त्याचा काहीच फायदा नाही. मग शासन हे विमानतळ कुणासाठी लादत आहे? असा सवालही त्यांनी केला.

Web Title: Gunda will not allow land acquisition for airport: Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.