नारायणगडावर सापडले तोफगोळे

By admin | Published: May 6, 2015 05:38 AM2015-05-06T05:38:31+5:302015-05-06T05:38:31+5:30

नारायणगडावरील मातीने पूर्णपणे गाडली गेलेल्या प्राचीन पाण्याच्या टाकीतील माती बाहेर काढत असताना तोफगोळे आढळले आहेत.

The gunfight found in Narayanagad | नारायणगडावर सापडले तोफगोळे

नारायणगडावर सापडले तोफगोळे

Next

अशोक खरात,  खोडद
नारायणगडावरील मातीने पूर्णपणे गाडली गेलेल्या प्राचीन पाण्याच्या टाकीतील माती बाहेर काढत असताना, या टाकीत सुमारे १२ फूट खोल अंतरावर अनेक प्राचीन वस्तू आढळून आल्या, मडक्याचे तुकडे, काचेच्या बांगड्या, जात्याचा तुकडा, जुन्या विटा, खापरी कौलाचे तुकडे आणि विशेष बाब म्हणजे- सुमारे ३ ते ४ इंच व्यासाचे दोन दगडी तोफगोळे या टाकीत सापडले.
या दगडी गोळ्यांचा उपयोग पूर्वीच्या काळी गोफण गुंडे म्हणून; तसेच तोफगोळे म्हणूनही केला जायचा. गोफणगुंडे म्हणजे शत्रूवर गोफणीतून मारा करण्यासाठी गनिमी काव्यातील एक शस्त्र म्हणून तर हेच गोळे तोफगोळे म्हणूनही वापरले जायचे, असे पुरातत्त्व अभ्यासक आबा परांजपे यांनी सांगितले.
नारायणगड संवर्धनाच्या कार्याची दखल घेऊन पुरातत्त्व अभ्यासक संदीप उर्फ आबा परांजपे यांनी नुकतीच किल्ले नारायणगडावर संशोधनाच्या निमित्ताने भेट दिली. या वेळी आबा परांजपे यांनी जुन्नरच्या हिस्ट्री क्लबच्या विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना नारायणगडाच्या पूर्व काळाबद्दल दुर्मिळ अशी माहिती दिली व दुगसंवर्धन कसे करावे, या विषयी मार्गदर्शन केले.
या वेळी नारायणगडाच्या इतिहासाबद्दल बोलताना आबा परांजपे म्हणाले की, पुणे मॅझेटियर मध्ये हा किल्ला पेशव्यांनी बांधला आहे, असा उल्लेख आहे. परंतु, नारायणगडाच्या पायऱ्यांची रचना, नारायणगडावरील विविध कालखंडात तयार केलेल्या पाण्याच्या टाक्या यानुसार नारायणगड हा प्राचीन काळात बांधला गेला असावा, असे वाटते. नारायणगडावर यादव काळातील खडकाच्या पोटात खोदलेले खोल टाके, बहामनीकाळातील पायऱ्यांची रचना असलेले गडावरील सर्वांत मोठे टाके, सातवाहन काळातील टाकी, मराठा काळातील गडावरील प्रसिद्ध नारायण टाके याबद्दल अनेक दुर्मिळ माहिती आबा परांजपे यांनी या वेळी सांगीतली. आबा परांजपे यांनी गुगल मॅपिंगवरून नारायणगडावरील अनेक वस्तू उजेडात आणल्या आहेत. यामध्ये गडावरील बारूदखान्याचा व अनेक नवीन टाक्यांचा समावेश आहे.
शनिवारी प्रा. विनायक खोत सर यांच्या मार्गदशर्नाखाली जुन्नर हिस्ट्री क्लब २० विद्यार्थ्यांनी नारायणगडावर श्रमदान केले. या श्रमदानात सिद्धी जाधव,अक्षदा घोलप, साक्षी जाधव, गौरी घोलप, जयश्री घोलप, निकिता घोलप, माधुरी मोझे, मयूरी घोलप, मिर्झा शबनम, विशाल घोलप, ओंकार ढाके, शेख हसन, राज मोझे, अर्जुन राऊत, मिर्झा जुनेद, ओंकार परदेशी, जीवन जाधव या विद्यार्थ्यांसह प्रा. विनायक खोत सर, पर्यावरण अभ्यासक सुभाष कुचिक, पुरातत्त्व अभ्यासक आबा परांजपे, गिर्यारोहक निलेश खोकराळे यांनी सहभाग घेतला. नारायणगड संवर्धनासाठी केवळ व्हॉटसअ‍ॅपवर मदतीचे आवाहन करताच व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमधील सदस्यांनी देणगी स्वरूपात ३५ हजार रुपये रोख रक्कम जमा केली आहे. या ग्रुपमधील ४० तरुणांनी आतापर्यंत दोन वेळा नारायणगडावर श्रमदान करून गडावरील मातीने गाडली गेलेल्या पाण्याच्या टाकीतील माती बाहेर काढली आहे.

दुर्गप्रेमी निसर्गमित्र
> गडावरील राजवाड्याच्या शिल्पांमध्ये दरवाजावरील गणेशपट्टी व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ह्यशरभ शिल्पह्ण या राजवाड्याजवळ सापडले आहे.
> नारायणगाव, हिवरे, खोडद, मंचर, जुन्नर तसेच पुणे येथील सुमारे १०० दुर्गप्रेमी तरुणांचा व्हॉट्सअ‍ॅपवर दुर्गप्रेमी -निसर्ग मित्र नावाचा
ग्रुप आहे.
> महाराष्ट्रातील गडकोट-किल्ल्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून दुगसंवर्धनाचे कार्य करणाऱ्या शिवाजी ट्रेल या संस्थेचे राज्याचे अध्यक्ष मिलिंद क्षीरसागर व जॅक समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. विनायक खोत सर यांच्या मार्गदशर्नाखाली या ग्रुपच्या माध्यमातून नारायणगड संवर्धनाचे काम हाती घेतले आहे.

> नारायणगड संवर्धन अभियानांतर्गत या गडावरील मातीने पूर्णपणे गाडलेली व झाडी-झुडपांनी वेढलेली प्राचीन पाण्याची टाकी प्रा. विनायक खोत सर यांनी शोधून काढली असून, या ग्रुपच्या वतीने श्रमदान करून या प्राचीन टाकीतील माती बाहेर काढण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
> या ग्रुपच्या वतीने आतापर्यंत ३ वेळा श्रमदान करून टाकीतील बरीचशी माती बाहेर काढल्यानंतर ही टाकी सुमारे १२ फूट रुंद, २२ फूट लांब, तर २० फूट खोल असल्याचे लक्षात आले.

Web Title: The gunfight found in Narayanagad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.