पोरके झालेल्या विद्यार्थ्यांना गुरुकुल देणार शिक्षणाचे छत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:08 AM2021-06-19T04:08:55+5:302021-06-19T04:08:55+5:30

बारामती : कोरोना काळात ज्या मुलांच्या डोक्यावरून आई-वडीलांचे छत्र हरविले, अशा मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश देऊन ...

Gurukul will provide education umbrella to orphans | पोरके झालेल्या विद्यार्थ्यांना गुरुकुल देणार शिक्षणाचे छत्र

पोरके झालेल्या विद्यार्थ्यांना गुरुकुल देणार शिक्षणाचे छत्र

Next

बारामती : कोरोना काळात ज्या मुलांच्या डोक्यावरून आई-वडीलांचे छत्र हरविले, अशा मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश देऊन त्यांना शैक्षणिक फीमध्ये विशेष सवलती देण्याची योजना बारामती तालुक्यातील श्री हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावळ या शाळेने सुरु केली आहे. या योजनेमुळे आई-वडिलांची माया नाही तर किमान त्यांचे दु:ख हलके करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे यांनी दिली.

कोविडमुळे पालकांवर आलेले आर्थिक संकट लक्षात घेऊन यंदाच्या वर्षातील शैक्षणिक शुल्क न वाढविता त्या फीमध्ये १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर आजी माजी सैनिकांच्या मुलांना देखील मोफत शिक्षण, मुलींच्या फीमध्ये २० टक्के सवलत, अनाथ मुलांना मोफत शिक्षण, वडील नसलेल्या विद्यार्थ्यांना फी मध्ये ५० टक्के सवलत, आदी सवलती देऊन शाळेने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.

विशेष सवलती देण्यासाठी नेहमीच प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी संस्थेचे सचिव मानसिंग आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, अलका आटोळे, पल्लवी सांगळे, ललित भरणे, दिपक सांगळे, दिपक बिबे, सीईओ संपत जायपात्रे, विभाग प्रमुख गोरख वणवे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, राधा नाळे, निलीमा देवकाते, स्वप्नाली दिवेकर यांचाही पुढाकार महत्वपूर्ण ठरला आहे.

————————————————

संस्था जहिरातदार असल्याने

बातमी सविस्तर आवश्यक

Web Title: Gurukul will provide education umbrella to orphans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.