शिक्रापूरला ४३ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:08 AM2021-07-10T04:08:45+5:302021-07-10T04:08:45+5:30

तीन वाहनांसह ७८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, १४ जणांवर गुन्हे दाखल कोरेगाव भीमा/ शिक्रापूर : सणसवाडी (ता. शिरूर) हद्दीतून ...

Gutka worth Rs 43 lakh seized in Shikrapur | शिक्रापूरला ४३ लाखांचा गुटखा जप्त

शिक्रापूरला ४३ लाखांचा गुटखा जप्त

Next

तीन वाहनांसह ७८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, १४ जणांवर गुन्हे दाखल

कोरेगाव भीमा/ शिक्रापूर : सणसवाडी (ता. शिरूर) हद्दीतून बेकायदेशीरपणे राज्यात बंदी असलेला गुटखा वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर पोलिसांनी कारवाई करत तब्बल ४३ लाखांचा गुटख्यासह ७८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत १४ जणांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा केला.

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व पोलीस हवालदार सचिन मोरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी लखन अश्रुबा लोंढे (वय २७, रा. मोशी टोलनाका, ता. हवेली), सुरेश रामभाऊ कसाब (वय २१, रा. चिंबळी फाटा चाकण), कृष्णा बालाजी बिंडे (वय २१, रा. गंधर्वनगरी मोशी जि. पुणे मूळ रा. बोरवंड ता. गंगाखेड जि. परभणी), अंकित शिवमोहन सिंग (रा. चाकण ता. खेड जि. पुणे), बापू गवते (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), अंकुर सुनील गुप्ता (रा. चाकण ता. खेड जि. पुणे), वीरेंद्र बुद्धसेन गुप्ता (रा. करंजाडे जि. रायगड), महेश जसराज भाटी (रा. शिवकल्याणनगर कोथरूड जि. पुणे), नरेश देवासी रा. चऱ्होली रोड आळंदी ता. खेड जि. पुणे, ओमजी ( पूर्ण नाव पत्ता माहीत नाही ) यांसह तीनही वाहनांचे मालक व शोएब रोड लाईन्स पॅकर्स अँड मुव्हर्सचे मालक ( पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सणसवाडी येथून राज्यात बंदी असलेला गुटखा घेऊन तीन वाहने चाकण दिशेने जाणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली. त्यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शिंदे, पोलीस हवालदार सचिन मोरे, सागर कोंढाळकर, पोलीस नाईक अशोक केदार यांसह आदींनी पुणे नगर मार्गावर सापळा रचला. या वेळी त्यांना तीन संशयित वाहने तेथून जाताना दिसली. ही तिन्ही वाहने पोलिसांनी थांबवत त्यांची पाहणी केली. त्यात गुटखा आढळला. पोलिसांनी एक २० लाखांचा कंटेनर, एक १० लाखांची मोटार, तर ५ लाखांचा छोटा टेम्पो जप्त केला. त्यात गोण्यांमध्ये भरलेला तब्बल ४३ लाख ३ हजार २०० रुपयांचा गुटखा सापडला. वाहनांमध्ये राज्यात बंदी असलेला विमल गुटखा आढळला. या कारवाईत कंटेनरमध्ये गोण्यांमध्ये सुमारे २० लाख रूपये किमतीचा व्ही वन तंबाखू पॅकिंगचे पुडे, विमल पानमसाल्याचे पुडे आढळले. एका बलेरो मोटारीत सुमारे १९ लाख २३ हजार रुपयाचा गुटखा गोणीमध्ये भरला असल्याचे सापडले. व्ही वन तंबाखूच्या १०४० पॅकिंग पुडे व ३६ गोण्यांमधे विमल पानमसाल्याच्या पुडे भरले होते. तर टेम्पोमध्ये सुमारे ४ लाख ७० हजार रुपये किमतीचा गुटखा व तंबाखू गोण्यांमध्ये आढळला. या तिन्ही वाहनांमध्ये शोएब रोड लाईन्स पॅकर्स अॅण्ड मुव्हर्सचे बिलटी कागदपत्रे. तसेच महेश जसराज भाटी, अंकुर सुनील गुप्ता, वीरेंद्र बुध्दसेन गुप्ता यांचे आधारकार्ड झेरॉक्स जोडलेले पॅकिंग लिस्ट आढळले.

Web Title: Gutka worth Rs 43 lakh seized in Shikrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.