चाकणला साडेचार लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:17 AM2021-02-17T04:17:21+5:302021-02-17T04:17:21+5:30
सोमवारी (दि. १५) सायंकाळी ७ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस ...
सोमवारी (दि. १५) सायंकाळी ७ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी दिली. पुणे नाशिक महामार्गवर वाकी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा वाहतूक करणारा टेम्पो उभा असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार चाकण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी सापळा रचत वाकी येथील आडवळणावर थांबलेला गुटख्याचा टेम्पो ताब्यात घेतला व तपासणी केली. या टेम्पोमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचा सुमारे २ लाख १२ हजार ४०० रुपयांचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मिळून आला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सहायक पोलीस आयुक्त राम जाधव, चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय जगदाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.