गुटखा, पानमसाला व तंबाखू जप्त, खेड गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:10 AM2021-05-13T04:10:04+5:302021-05-13T04:10:04+5:30

दि.१० रोजी खेड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. की, नारायणगाव येथून एक व्यक्ती राजगुरुनगर येथे गुटखा घेऊन ...

Gutkha, Panamsala and tobacco seized, raid by Khed Crime Branch squad | गुटखा, पानमसाला व तंबाखू जप्त, खेड गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा

गुटखा, पानमसाला व तंबाखू जप्त, खेड गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा

Next

दि.१० रोजी खेड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. की, नारायणगाव येथून एक व्यक्ती राजगुरुनगर येथे गुटखा घेऊन विक्रीसाठी मोटारसायकलवर येणार आहे, अशी माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शोधपथकाचे पोलीस निरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार सचिन जतकर, निखिल गिरीगोसावी, स्वप्निल गाढवे, शेखर भोईर, विशाल कोठावळे यांच्या पथकाने पानमळा येथे पुणे -नाशिक महामार्गावर सापळा रचला होता. दुपारी तीनच्या सुमारास एक जण मोटार सायकलवर एक पोते घेऊन येत असल्याने पोलिसांना त्याचा संशय आला. त्याला ताब्यात घेतले असता तसेच पोत्यामध्ये सुमारे ५० हजार रुपयांचा गुटखा मिळून आला, त्यांचे नाव विचारले असता अक्षय जयवंत शिंगोटे असे सांगितले. हा गुटखा पोलिसांनी जप्त करून शिंगोटे यांची सखोल चौकशी केली असता सदरचा गुटखा नारायणगाव येथून खरेदी करून विक्रीसाठी आणला असल्याची पोलिसांना कबुली दिली. खेड पोलिसांनी नारायणगाव येथे जाऊन नारायणगाव पोलिसाच्या मदतीने संतोष अंतुनाथ चव्हाण ,अकलाब आतार यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विक्रीसाठी ठेवलेला वेगवेगळया प्रकाराचा गुटखा, तंबाखू असा १ लाख ३७ हजार रुपयांचा अवैधरित्या बाळगलेला गुटखा जप्त केला. एक मोटारसायकल जप्त करून आरोपांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गुरव करीत आहे. खेड पोलीस ठाण्याअंर्तगत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडली तर इतर दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. वस्तूंसह इतर साहित्यांची विक्री करत आहेत. सध्या गुटखा, दारू विक्रीही अनेकजण करत आहेत. या विरुद्ध पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. त्यामुळे काही प्रमाणात जरब बसली आहे. राजगुरूनगर येथे पोलिसांनी अवैधरित्या गुटखा जप्त करून तीन आरोपींना ताब्यात घेतले.

Web Title: Gutkha, Panamsala and tobacco seized, raid by Khed Crime Branch squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.