१४ लाखांचा गुटखा जप्त; उरुळी कांचन पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 04:14 PM2024-03-26T16:14:15+5:302024-03-26T16:14:49+5:30
उरुळी कांचन हद्दी मधून गुटखा वाहतूक करणारे वाहन जाणार आहे अशी माहिती उरुळी कांचन पोलिसांना मिळाली होती
उरुळी कांचन: उरुळी कांचन येथे अवैध गुटखा वाहतूक करणारा टेम्पो उरुळी कांचन पोलिसांनी दि (२४) रोजी पकडून १३ लाख ८१ हजार १३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उरुळी कांचन चे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दि.(२४) रोजी सायंकाळच्या वेळेस उरळी कांचन गावच्या हद्दीतील दत्तवाडी परिसरामध्ये संदीप सुभाष कांचन यांच्या राहत्या घराशेजारी आडोशाला, ही कारवाई केली आहे. उरुळी कांचन हद्दी मधून गुटखा वाहतूक करणारे वाहन जाणार आहे अशी माहिती उरुळी कांचन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून एक टेम्पो व चालक समीर जयसिंग कांचन रा. उरुळी कांचन याची गाडी अडवून वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये विमल नावाचा पान मसाला, सुगंधित तंबाखू असलेली खाकी रंगाची पोती आढळून आली त्यानुसार बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.