इंदापूरात २० लाखांच्या गुटख्यासह ३० लाखाचा मद्देमाल जप्त; एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 05:21 PM2022-03-18T17:21:33+5:302022-03-18T17:31:55+5:30
ड्रायव्हरकडे चौकश केली असता ड्रायव्हरने सरूवातीला उडवा उडवीची उत्तरे....
इंदापूर (पुणे):इंदापूर शहरातील बाह्यवळण महामार्ग सोलापूर - पुणे हायवे रोडवर, डोंगराई सर्कल नजिक इंदापूर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान संशयित आयशर ट्रकमधील २० लाख रूपये कांमतीचा आरके कंपनीचा तंबाखू गुटखा व १० लाख रूपये किंमतीचा आयशर ट्रक इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ट्रक चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती इंदापूर वरिष्ठ पोलीस निरिक्षक तय्यब मुजावर यांनी दिली.
डोंगराई सर्कल येथे इंदापूर पोलिसांकडून शुक्रवारी सकाळी नाकाबंदी कारवाई सुरू होती. नाकाबंदी दरम्यान सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक (क्र. के.ए.०१, ए.एल. ९१२१) या गाडीचा पोलिसांना संशय आल्याने सदरची गाडी थांबवून ड्रायव्हरकडे चौकश केली असता ड्रायव्हरने सरूवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसांनी गाडीतील मालाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला वरील प्रमाने २० लाख रूपये किंमतीचा आर. के. तंबाखू मिश्रीत गुटखा मिळून आला.
ट्रकमध्ये एकूण ४५ बाॅक्स, एका बाॅक्समध्ये सहा पिशव्या व एका पिशवीत ५० पाऊच असे एकूण २० लाख रूपये किंमतीचे ४५ बाॅक्स गुटखा पोलिसांनी जप्त केला असून १० लाख रूपये किंमतीचा ट्रक व ट्रक ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख व बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली इंदापूर वरिष्ठ पोलीस निरिक्षक तय्यब मुजावर, सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय लिगाडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश माने, पो. ना. सलमान खान, बापू मोहिते, विनोद काळे यांचे पथकाने केली असून पुढील तपास इंदापूर पोलिस करत आहेत.