दौंड तालुक्यातील वरवंड येथे अकरा लाखांचा गुटखा जप्त; यवत पोलिसांची दमदार कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 04:49 PM2024-09-16T16:49:51+5:302024-09-16T16:50:39+5:30
घराशेजारी एका बंद खोलीत यवत पोलिसांनी छापा गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू असा एकूण ११ लाख २ हजार ६४० रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला
वरवंड : ता.दौंड वरवंड गावामध्ये यवत पोलिसांनी एका बंद खोलीत छापा टाकून आरोग्यास घटक असलेला गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू असा ११ लाख २ हजार रुपये किंमतीचा गुटखा पोलिसांनी ताब्यात घेतला. वरवंड येथील रेवणनाथ गोसावी यांच्या घराशेजारी एक खोलीत रविवारी (दि. १५) रात्री १ च्या सुमारास केली पोलिसांनी छापा टाकून माल हस्तगत केला. याबाबत पोलीस हवालदार रविंद्र रामदास गोसावी यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून आरोपी रेवणनाथ हरीभाऊ गोसावी (रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरवंड गावच्या हद्दीतील रेवणनाथ गोसावी यांच्या घराशेजारी एका बंद खोलीत यवत पोलिसांनी छापा गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू असा एकूण ११ लाख २ हजार ६४० रुपये किंमतीचा विक्रीस बंदी असलेला बेकायदेशीरपणे साठवणूक केलेला गुटखा हस्तगत केला. याबाबत रेवणनाथऊ गोसावी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संपांगे हे करीत आहेत. ही कारवाईत यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, उत्तम कांबळे, पोलीस हवालदर रविंद्र गोसावी, गुरुनाथ गायकवाड, हिरालाल खोमणे, पोलीस नाईक निखील रणदिवे, पोलीस अंमलदर शुभम मुळे, दत्तात्रय टकले, मोहन भानवसे,महिला अंमलदार हेमलता भोंगळे, प्रतीक्षा हांडगे यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संपांगे हे करीत आहेत.