नारायणगावात १९ हजारांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:10 AM2021-04-27T04:10:38+5:302021-04-27T04:10:38+5:30
स्वप्नील किसन घोडे (वय २१), जेठालाल जोगराणा (वय १८, दोघे रा. निमगाव सावा, ता. जुन्नर) अशी अटक केलेल्यांची नावे ...
स्वप्नील किसन घोडे (वय २१), जेठालाल जोगराणा (वय १८, दोघे रा. निमगाव सावा, ता. जुन्नर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती देताना नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज म्हणाले की, पोलिसांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, नारायणगाव हद्दीत कोल्हेमळा-येडगाव रोडवर कॅनॉलचे शेजारी काहीजण दुचाकीवरून अवैध गुटखा विक्रीसाठी घेऊन येणार आहेत. त्यानुसार पोलीस हवालदार काठे, सहायक फौजदार ढमाले, पोलीस कॉन्स्टेबल लोहोटे, होमगार्ड सोनवणे यांच्या पथकाने कोल्हेमळा-येडगाव रोड सापळा रचला. कॅनॉलवरून आलेल्या दोन इसमांना हटकले व दुचाकी (एम एच १४ एस व्ही ५०६३ ) थांबवून त्यांची झडती घेतली. त्या वेळी प्लास्टिकच्या पिशवीत १८ हजार ९६० रुपयांचा अवैध गुटखा सापडला. त्यांची दुचाकीसह गुटखा असा एकूण ९३ हजार ९६० मुद्देमाल पथकाने जप्त केला व दोघांना अटक केली.
याप्रकरणी पोलीस हवालदार रमेश लक्ष्मण काठे यांनी फिर्याद दिली. ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तपास महिला उपपोलीस निरीक्षक नवघरे या करीत आहे. ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार काठे, सहायक फौजदार ढमाले, पोलीस कॉन्स्टेबल लोहोटे, होमगार्ड सोनवणे या पोलीस पथकाने केली आहे.