दौंडला सात लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:11 AM2021-04-21T04:11:32+5:302021-04-21T04:11:32+5:30

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी अमृत देशमुख यांच्या ...

Gutkha worth Rs 7 lakh seized from Daund | दौंडला सात लाखांचा गुटखा जप्त

दौंडला सात लाखांचा गुटखा जप्त

Next

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी अमृत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे, विजय वाघमारे, अंमलदार शरद वारे, विशाल जावळे, किरण ढुके, जब्बार सय्यद, योगेश गोलांडे, आप्पा वाकळे या पोलीस पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, या घटनेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

दादागिरीला भीक घालू नका

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये अवैध धंद्याना जरब बसविणे ही बाब कायद्याच्या दृष्टीने जमेची बाब आहे. सर्वसामान्य जनतेनी अवैध धंद्यावाल्यांची दादागिरी लादून अन्याय सहन करू नका. जो कोणी दादागिरी करीत असेल त्याच्यासंदर्भात थेट संपर्क करा, मात्र दादागिरीला भीक घालू नका.

-मयूर भुजबळ, पोलीस उपअधीक्षक

दौंड येथे पोलिसांनी पकडलेला बेकायदेशीर गुटखा, विदेशी सिगारेट.

Web Title: Gutkha worth Rs 7 lakh seized from Daund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.