ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन
By admin | Published: January 4, 2016 12:53 AM2016-01-04T00:53:08+5:302016-01-04T00:53:08+5:30
महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी अभिवादन करण्यात आले. मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस पिंपरी चौकातील महात्मा फुले
पिंपरी : महापालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी अभिवादन करण्यात आले. मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस पिंपरी चौकातील महात्मा फुले पुतळ्याजवळ व मोशी येथील त्यांच्या अर्धपुतळ्यास महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, आयुक्त राजीव जाधव व स्थायी समिती सभापती अतुल शितोळे यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही महापौर धराडे, उपमहापौर वाघेरे, आयुक्त जाधव व स्थायी समिती सभापती शितोळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
महापालिका भवनात व पिंपरी चौकातील महात्मा फुले पुतळ्याजवळ झालेल्या कार्यक्रमास शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, माजी वृक्षप्राधिकरण समिती सदस्य आनंदा कुदळे, सहआयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता महावीर कांबळे, सहायक आयुक्त दत्तात्रय फुंदे, चंद्रकांत इंदलकर, कार्यकारी अभियंता सतीश इंगळे, देवण्णा गट्टूवार, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, रामकिसन लटपटे, माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले आदी उपस्थित होते.
मोशी येथील कार्यक्रमास नगरसदस्य धनंजय आल्हाट, अरुण बोऱ्हाडे, नगरसदस्या मंदा आल्हाट, मुख्याध्यापिका रतन डुंबरे, पुष्पा माने, सामाजिक कार्यकर्ते दिलीप बोराटे, महात्मा फुले विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. महापौर धराडे व नगरसदस्य बोऱ्हाडे यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी संबोधित केले. बोदडे यांनी सूत्रसंचालन केले.
भारतीय बौद्ध महासभा
भारतीय बौद्ध महासभेच्या पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या संयुक्त विद्यमाने जयंती दिन सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाबुद्धविहार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मोहननगर, महात्मा फुलेनगर, चिंचवड येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पमाळा अर्पण करुन वंदन करण्यात आले. सामुदायिक वंदना, महाबुद्धपूजा पाठ संकल्प, गाथा पठन, आंबेडकरांनी दिलेल्या धम्म प्रतिज्ञा सामुदायिकपणे ग्रहण करणे असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी पंडीत जाधव, भदन्त महाथेरो, डी.के.तांबे, संदिपान गायकवाड, व्ही.बी.सोनवणे, पंचशीला तांबे, विशाखा कांबळे, सुरेखा आरावाडे, नमिता जाधव, सुनंदा वाघमारे उपस्थित होते.
ज्ञानप्रभात विद्यामंदिर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले ट्रस्टचे ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालयामध्ये संस्थेचे संस्थापक विठ्ठल गवळी, निळकंठ लांडगे, बाळासाहेब सावंत, सुमन गवळी, प्रज्ञा सोनवणे, राहुल गवळी, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सावित्रीबार्इंच्या जीवनकार्यावर भाषणे केली. संस्थेच्या अध्यक्षांनी सावित्रीबार्इंची कार्याची महती कथीत केली व स्त्री-शिक्षणाचे महत्व समजाऊन सांगितले.
रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन
रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने स्त्री शिक्षणाची जननी सावित्रीबाई यांना अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसरात सावित्रीबाईंच्या पुतळ्यास फेडरेशनचे पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चांदमारे रिपाईचे नेते सम्राट जकाते, रिपाई महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत, दिपक ओव्हाळ, सतिश कसबे, नारायण वानखेडे, प्रकाश चांदमारे उपस्थित होते.
रिपब्लिकन सेना
सावित्रीबाई यांच्या तैलचित्रास रिपब्लिकन सेनेतर्फे शहराध्यक्ष नीलेश जगताप यांनी पुष्पहार अर्पण केला. फुले-शाहू-आंबेडकर विचार विकास प्रतिष्ठानाचे अध्यक्ष हरीष डोळस, पांडुरंग डोंगरे, सुभाष बनसोडे, संतोष सकपाळ, बाळासाहेब गायकवाड, अनिल डोळस, कमल धुळधुळे, विद्या नासे, प्रफुल्ल गायकवाड, किरण पंडित उपस्थित होते. (प्रतिनिधी)