औषधनिर्मितीत ‘एचए’ने घ्यावी उभारी

By admin | Published: March 28, 2017 02:26 AM2017-03-28T02:26:02+5:302017-03-28T02:26:02+5:30

केंद्र सरकारने शंभर कोटी एवढी भरीव मदत केल्यानंतर हिंदुस्तान अँटिबायोटिकने (एचए) यापूर्वी आलेला तोटा भरून

'HA' in medicine | औषधनिर्मितीत ‘एचए’ने घ्यावी उभारी

औषधनिर्मितीत ‘एचए’ने घ्यावी उभारी

Next

पिंपरी : केंद्र सरकारने शंभर कोटी एवढी भरीव मदत केल्यानंतर हिंदुस्तान अँटिबायोटिकने (एचए) यापूर्वी आलेला तोटा भरून काढून पुन्हा एकदा प्रगतिपथावर राहिले पाहिजे आणि देशाच्या औषधनिर्मितीच्या क्षेत्रामध्ये पुन्हा उभारी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले.
केंद्रीय अर्थमंत्री जेटली व केंद्रीय रसायन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांची राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी भेट घेऊन एचए कंपनीचे पुनर्वसन आणि कामगारांचा थकीत पगार त्वरित मिळण्यासाठी चर्चा केली. या संदर्भामध्ये येत्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारकडून १०० कोटी वितरित होणार आहेत आणि कामगारांचा थकीत पगार आणि कंपनी चालू करण्याच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याचे आदेश एचए कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत, असे सांगितले.
मागील कारभारानुसार कंपनीत पुन्हा पुन्हा तोटा निर्माण होणे हे देशाच्या विकासाला बाधा आणणारे आहे. देशाच्या विकासाचा पैसा अशा तोट्यात जाणाऱ्या कंपनीवर पुन्हा खर्च करणे म्हणजे शोषित, पीडित, वंचितांच्या मार्गावर बाधा आणल्यासारखे होणार आहे. यासाठी संबंधित कंपनीने आपल्या कारभारामध्ये सुधारणा केली पाहिजे आणि कामगारांनी मेहनत केली पाहिजे, अशा भावना जेटली यांनी व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)

Web Title: 'HA' in medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.