हॅकेथॉनमध्ये साक्षी कोद्रे द्वितीय, तर तनुजा शेंडेकर तृतीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:14 AM2021-09-16T04:14:17+5:302021-09-16T04:14:17+5:30
लोणी काळभोर : जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातर्फे आयोजित ‘मेडॅक्स २०२१’ हॅकेथॉनमध्ये एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्य़ापीठातील एमआयटी स्कूल ऑफ ...
लोणी काळभोर : जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातर्फे आयोजित ‘मेडॅक्स २०२१’ हॅकेथॉनमध्ये एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्य़ापीठातील एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनिअरिंग सायन्स अँड रिसर्च विभाग, लोणी काळभोर, पुणे येथे तिसऱ्या वर्षात शिकणारी साक्षी कोद्रे हिने द्वितीय क्रमांकाचे तर चौथ्या वर्षात शिकणारी तनुजा शेंडेकर हिने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. मेडॅक्स हे देशातील सर्वात गंभीर वैद्यकीय समस्या सोडविण्यासाठी मिशन मोडवर कार्य करणारे वैद्यकीय मिशन आहे.
एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेली साक्षी कोद्रे हिने मेडॅक्स हॅकेथॉनमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे २ हजार डॉलरचे पारितोषिक जिंकले. तिने आणि तिच्या टीमने प्रकल्पात कॉकरोच डीबीच्या वापरासाठी थ्रीडी प्रिंटिंग पेनची निर्मिती केली आहे. वृद्ध रुग्णांमधील आरोग्य समस्या शोधण्याच्या आव्हानांना ट्रॅक करण्याचा शोध केला आहे.
तनुजा शेंडेकर व तिच्या टीमने मेडॅक्स ‘केअरहार्ट’ या ट्रॅक युजिंग स्मार्ट डिव्हाईसेस अँड इंटरगार्टेड मेडिकल हिस्टरी टू एनहान्स ऍक्सेस टू केअर या प्रकारात तिसऱ्या क्रमांकाचे १ हजार डॉलरचे रोख पारितोषिक जिंकले. त्यांनी परवडणाऱ्या किमतीत ईसीजी मॉनिटरिंग सोल्यूशन प्रस्तावित केले आहे.
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनिअरिंगचे संचालक प्रा. विनायक घैसास, एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनियरिंगच्या प्राचार्य डॉ. रेणू व्यास यांनी विद्यार्थ्यांच्या संशोधनातील यशाबद्दल अभिनंदन केले.